DIET: व्हिगन आहार मांसाहारापेक्षा अधिक फायद्याचा आहे का?

वेगन विरुद्ध मांसाहार

फोटो स्रोत, Getty Images

ह्यूगो आणि रोज या जुळ्या बहिणी तीन महिने एक प्रयोग म्हणून डाएटवर होत्या. या दरम्यान ह्यूगो व्हिगन (Vegan) बनल्या पण रोजने मात्र मटण खाणं सुरू ठेवलं.

"आम्ही जुळ्या असल्याने वेगवेगळ्या डाएट प्रकारांची आणि व्यायामाची तुलना आम्ही करू शकतो. यामुळे कोणता प्रकार किंवा पद्धत आमच्यासाठी अधिक प्रभावी आहे हे समजण्यास आम्हाला मदत होईल. शाकाहारी की मांसाहारी कोणता डाएट आमच्यासाठी योग्य आहे हे आम्हाला पहायचं होतं," असं रोज टर्नर म्हणाल्या.

दोघंही गेल्या 12 आठवड्यांपासून डाएट करत आहेत. या दरम्यान ह्यूगो व्हिगन बनल्या आणि रोजने मटण खाणं सुरू ठेवलं. दोघंही दर दिवशी एकसमान कॅलरीचं अन्न खात होत्या. तसंच व्यायामही एकसमान प्रमाणात सुरू होता.

व्हिगन आहारपद्धतीत मांसाहार, दूध आणि इतर प्राणीजन्य पदार्थांचं सेवन केलं जात नाही. या आहारात फळं, भाजीपाला, कडधान्य, डाळींचा समावेश असतो.

व्हिगन अन्न सुरू केलेल्या ह्यूगोच्या शरीराने सुरुवातीला लगेचच प्रतिसाद दिला नाही.

"मी व्हिगन डाएट खाते. त्याचा थेट माझ्या शरीरावर परिणाम होतो. पहिले दोन आठवडे मला मटण, चीज आणि डेअरी पदार्थ खाण्याची खूप इच्छा झाली. मला फळं खावी लागत होती. माझ्या शरीराला योग्य प्रमाणात साखर मिळत होती. माझ्यात अधिक ऊर्जा आहे असं मला वाटू लागलं." असं ह्युगो टर्नर म्हणाल्या.

तर रोज म्हणाल्या, "माझ्या मांसाहारी डाएटचा प्रभाव अस्थिर होता. मी जीममध्ये सुरुवातीचे काही दिवस खूप सक्रिय होते. नंतर मी अधिक आराम करू लागले. यावेळी ह्युगोच्या शरीरात मात्र अधिक ऊर्जा असल्याचं जाणवलं."

Vegan vs Meat

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही साखर किती प्रमाणात खाता केवळ हेच महत्त्वाचं नसतं तर तुमचं शरीर साखर कशी शोषून घेते हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

या दोघी आयडेंटिकल ट्विन्स म्हणजे जवळपास सारख्या दिसणाऱ्या जुळ्या असल्या तरीही त्यांचे शरीर साखर आणि चरबीला कसा प्रतिसाद देतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. रोज यांचे शरीर सरासरीपेक्षा अधिक साखर आणि चरबी प्रोसेस करू शकते.

अलीकडे वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की सुमारे 1 लाख कोटी विविध सूक्ष्मजीव आपल्या आतड्यांत राहतात. जर तुम्ही त्याची योग्य काळजी घेतली तर ते हजारो विविध रसायने तयार करतील.

ते तुमच्या शरीराला चांगल्या आकारात ठेवण्यास मदत करतात. ते तुमच्या मेंदूकडे जातात आणि तुम्हाला अती भूक आणि उदास न वाटू न देता ते तुमची काळजी घेतात.

जुळ्या मुलांमध्ये साधारण 25ते30 टक्के जंतू समान असल्याचं आपल्याला आढळल्याचं डॉ. टिम सांगतात. समान अन्नपदार्थांचं सेवन करूनही आपलं शरीर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया का देतं याचं हे उदाहरण आहे.

ह्यूगो म्हणतात, "शाकाहारी अन्न खाल्ल्याने आणि त्या 12 आठवड्यांतून माझ्या आतड्यातील जीवाणूंची विविधता खूपच कमी झाली आहे."

Vegan vs meat

फोटो स्रोत, Getty Images

"माझेही असेच होते, याचा अर्थ मी आजारी नाही," असं रोज म्हणाल्या.

ह्यूगो आणि रोज या सुदृढ खेळाडू आहेत. परंतु ज्यांची पोषणपातळी कमी असते, त्यांना विविध पदार्थांनी आपले आतडे निरोगी ठेवण्याची गरज असते.

"सर्वप्रथम तुम्हाला आठवड्यातून 30 प्रकारचे वनस्पती-आधारित पदार्थ खाणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे, तुम्हाला पॉलीफेनॉल नावाचे नैसर्गिक रसायने असलेले वनस्पती-आधारित अन्न खाणं आवश्यक आहे."

रंगीत बेरी, शेंगा, बिया, कॉफी आणि तिसरे म्हणजे प्रोबायोटिक्स-दह्यासारखे जिवंत सूक्ष्मजीव असलेले पदार्थ खावेत, असा सल्ला डॉ. टिम स्पेक्टर देतात.

एकूणच ह्युगो आणि रोजमध्ये फारसा फरक दिसून आलेला नाही. ह्यूगो टर्नर म्हणतात, " या दोन्ही आहारांमध्येमोठा फरक नसल्याचं आमच्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या वैद्यकीय आणि वैज्ञानिक संशोधकांनी म्हटलंय."

यावरून हे दिसून येतं की सर्वांना लागू होईल असं कोणतंही एक विशिष्ट डाएट वा आहारपद्धती नाही. अगदी जन्माने जुळे असणाऱ्यांनाही समान आहार मानवत नाही.

रोझ टर्नर म्हणतात, "तुम्हाला यापुढे कोणी सांगितलं की तुम्हाला शरीराची विशिष्ट रचना करण्यासाठी हा व्यायाम आणि आहार घेणं आवश्यक आहे तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. तुमच्यासाठी काय चांगलं आहे याची तुम्ही स्वत: चाचणी घ्या."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)