प्रिन्स फिलीप यांचा जीवनप्रवास - फोटोगॅलरी

ड्यूक ऑफ एडिनबरा, 1977
फोटो कॅप्शन, ड्यूक ऑफ एडिनबरांचा जन्म कोर्फू या ग्रीक बेटावर 10 जून 1921 रोजी झाला. डेन्मार्क, जर्मनी, रशिया आणि ब्रिटनमधल्या शाही कुटुंबांमधल्या सदस्यांचा त्यांच्या घराण्यात समावेश आहे.
line
लहानपणीचे फिलिप

फोटो स्रोत, Getty Images / Alamy

फोटो कॅप्शन, प्रिन्स फिलीप हे ग्रीसचे प्रिन्स अँड्र्यू आणि बॅटनबर्गच्या प्रिन्सेस अॅलिस यांचे एकुलते एक सुपुत्र होते.
line
सेंट क्लॉड मधल्या मॅकजॅनेट अमेरिकन स्कूलमध्ये त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. या फोटोमध्ये ते (डावीकडून दुसरे) त्यांच्या शाळासोबतच्यांसोबत दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सेंट क्लॉड मधल्या मॅकजॅनेट अमेरिकन स्कूलमध्ये त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. या फोटोमध्ये ते (डावीकडून दुसरे) त्यांच्या शाळासोबतच्यांसोबत दिसत आहेत. सात वर्षांचे असताना ते इंग्लंडमध्ये माऊंटबॅटन यांच्यासोबत रहायला गेले. तिथे सरेमधल्या प्रेप स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं.
line
16 वर्षांचे प्रिन्स फिलिप गॉर्डनस्टाऊनमध्ये

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, गॉर्डनस्टाऊन बोर्डिंग स्कूलमध्ये त्यांचं पुढचं शिक्षण पार पडलं. उत्तर स्कॉटलंडमधले शिक्षण महर्षी कर्ट हान यांनी ही शाळा सुरू केली होती. या शाळेत असताना ते खेळांमध्ये पारंगत होते.
line
प्रिन्सेस एलिझाबेथ (डावीकडून तिसऱ्या), महाराजे जॉर्ज (सहावे) आणि महाराणी एलिझाबेथ यांचा डार्टमथच्या रॉयल नेव्ही कॉलेजच्या भेटी दरम्यानचा चॅपलमधला फोटो. 23 जुलै 1939

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रिन्सेस एलिझाबेथ (डावीकडून तिसऱ्या) आणि तेव्हा नौदलात कॅडेट असणारे ग्रीस आणि डेन्मार्कटे प्रिन्स फिलीप (अगदी उजवीकडे पांढरी टोपी घातलेले) यांचा एकत्र काढण्यात आलेला हा पहिला फोटो असल्याचं मानलं जातं. 23 जुलै 1939 रोजीच्या डार्टमथच्या रॉयल नेव्ही कॉलेजच्या भेटी दरम्यानचा हा फोटो आहे.
line
Duke of Edinburgh, Royal Navy, Portsmouth

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रिन्स फिलीप HMS वॅलियंट या युद्धनौकेवर तैनात होते. या युद्धादरम्यान त्यांनी केलेल्या कामगिरीचा सैन्याच्या दस्तावेजांमध्ये गौरवाने उल्लेख करण्यात आला आहे.
line
लेफ्टनंट फिलीप माऊंटबॅटन यांचा प्रिन्सेस एलिझाबेथ यांच्यासोबत साखरपुडा

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, जुलै 1947मध्ये प्रिन्सेस एलिझाबेथ यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा झाल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं.
line
प्रिन्सेस एलिझाबेथ (नंतर महाराणी एलिझाबेथ द्वितीय) आणि ड्यूक ऑफ एडिंबरा प्रिन्स फिलीप यांच्या लग्नाचा बकिंगहॅम पॅलेसमध्ये काढण्यात आलेला अधिकृत फोटो, 20 नोव्हेंबर 1947

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, 20 नोव्हेंबर 1947ला त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
line
तुर्कीमधल्या मार्मरीस बीचवरचा एका फोटोग्राफरने टिपलेला हा क्षण.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुर्कीमधल्या मार्मरीस बीचवरचा एका फोटोग्राफरने टिपलेला हा क्षण. HMS मॅगपाय बोटीवर कमांड म्हणून नेमणूक झालेली असतानाचा हा फोटो आहे. हे त्यांचं शेवटचं पोस्टिंग होतं. 1951
line
कॉड्रे पार्कमध्ये रोहॅम्प्टन कपच्या सेमी-फायनलदरम्यान पोलो खेळताना प्रिन्स फिलीप. ते ब्रिटनमधल्या आघाडीच्या पोलो खेळाडूंपैकी एक होते.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, कॉड्रे पार्कमध्ये रोहॅम्प्टन कपच्या सेमी-फायनलदरम्यान पोलो खेळताना प्रिन्स फिलीप. ते ब्रिटनमधल्या आघाडीच्या पोलो खेळाडूंपैकी एक होते.
line
ड्यूकना क्रिकेटचीही आवड होती. या फोटो दरम्यानच्या मॅचमध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखालच्या इंग्लंडच्या माजी खेळाडूंच्या टीमचा सामना नॉरफ्लॉकचे ड्यूक नेतृत्व करत असलेल्या ससेक्सच्या खेळाडूंच्या संघाशी झाला होती.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, ड्यूकना क्रिकेटचीही आवड होती. या फोटो दरम्यानच्या मॅचमध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखालच्या इंग्लंडच्या माजी खेळाडूंच्या टीमचा सामना नॉरफ्लॉकचे ड्यूक नेतृत्त्व करत असलेल्या ससेक्सच्या खेळाडूंच्या संघाशी झाला होती.
line
महाराणी, ड्यूक आणि त्यांची चार मुलं
फोटो कॅप्शन, ड्यूक आणि महाराणी यांना चार मुलं आहेत, (डावीकडून) एडवर्ड, अँड्र्यू, अॅन आणि चार्ल्स. हा 1960च्या दशकातला फोटो आहे.
line
त्यांच्या बाल्मोरल इस्टेटमधल्या शेताला दिलेल्या भेटीदरम्यानचा हा फोटो. महाराणी आणि ड्यूक यांच्या लग्नाचा हा 25वा वाढदिवस होता.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, त्यांच्या बाल्मोरल इस्टेटमधल्या शेताला दिलेल्या भेटीदरम्यानचा हा फोटो. महाराणी आणि ड्यूक यांच्या लग्नाचा हा 25वा वाढदिवस होता.
line
महाराणींच्या कारभाराची सिल्व्हर ज्युबिली (25 वर्षं) साजरी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या टूरदरम्यानचा 1977चा न्यूझीलंडमधला फोटो. यामध्ये महाराणी आणि ड्यूक ऑफ एडिंबरांनी माओरी काहू - किवी (किवी पक्षाच्या पिसांचे कोट) घातले आहेत. न्यूझीलंडच्या गिसबोर्नमध्ये त्यांनी रॉयल न्यूझीलंड पॉलिनेशियन फेस्टिव्हलचं उद्घाटन केलं.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, महाराणींच्या कारभारचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या टूरदरम्यानचा 1977चा न्यूझीलंडमधला फोटो. यामध्ये महाराणी आणि ड्यूक ऑफ एडिंबरांनी माओरी काहू - किवी (किवी पक्षाच्या पिसांचे कोट) घातले आहेत. न्यूझीलंडच्या गिसबोर्नमध्ये त्यांनी रॉयल न्यूझीलंड पॉलिनेशियन फेस्टिव्हलचं उद्घाटन केलं.
line
ब्रिटानिया या रॉयल यॉटच्या जवळून जाणाऱ्या काँकोर्ड विमानाला हात करताना. बार्बेडोसजवळच्या समुद्रातला फोटो, 1977

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, ब्रिटानिया या रॉयल यॉटच्या जवळून जाणाऱ्या काँकोर्ड विमानाला हात करताना. बार्बेडोसजवळच्या समुद्रातला फोटो, 1977
line
ऑगस्ट 1979मध्ये लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. ते आयर्लंडमध्ये असताना IRAने त्यांच्या बोटीवर बॉम्बस्फोट घडवून आणला. ही बातमी समजल्यानंतर ड्यूक ऑफ एडिंबरा फ्रान्समधून युकेमध्ये परतले.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, ऑगस्ट 1979मध्ये लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. ते आयर्लंडमध्ये असताना IRAने त्यांच्या बोटीवर बॉम्बस्फोट घडवून आणला. ही बातमी समजल्यानंतर ड्यूक ऑफ एडिंबरा फ्रान्समधून युकेमध्ये परतले.
line
ट्रूपिंग द कर्लस सोहळ्यादरम्यान बकिंगहॅम पॅलेसच्या वरून झेपावणारी विमानं पाहताना. (डावीकडून) ड्यूक ऑफ एडिंबरा, (मागे) प्रिन्स एडवर्ड, महाराणी एलिझाबेथ द्वितीय, प्रिन्सेस अॅन, प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स, (कडेवर) प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, ट्रूपिंग द कर्लस सोहळ्यादरम्यान बकिंगहॅम पॅलेसच्या वरून झेपावणारी विमानं बाल्कनीतून पाहताना. (डावीकडून) ड्यूक ऑफ एडिंबरा, (मागे) प्रिन्स एडवर्ड, महाराणी एलिझाबेथ द्वितीय, प्रिन्सेस अॅन, प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स, (कडेवर) प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना.
line
1966मध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्यासोबत

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, 1966मध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्यासोबत.
line
महाराणींच्या राज्यकारभाराला 50 वर्षं झाल्या निमित्त 2002मध्ये गोल्डन ज्युबिली सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. किंग्सटन टाऊनच्या भेटी दरम्यानचा एक क्षण.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, महाराणींच्या राज्यकारभाराला 50 वर्षं झाल्या निमित्त 2002मध्ये गोल्डन ज्युबिली सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. किंग्सटन टाऊनच्या भेटी दरम्यानचा एक क्षण.
line
तरुणांना वाव देण्यासाठी 1956मध्ये एक पुरस्कार योजना ड्यूक ऑफ एडिंबरांनी सुरू केली. 2010मधल्या विजेत्यांसोबत हास्यविनोद करताना ड्यूक.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, तरुणांना वाव देण्यासाठी 1956मध्ये एक पुरस्कार योजना ड्यूक ऑफ एडिंबरांनी सुरू केली. 2010मधल्या विजेत्यांसोबत हास्यविनोद करताना ड्यूक.
line
वयाने ज्येष्ठ झाल्यानंतरही ड्यूक क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत. सँड्रिंगहमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घोडागाडी शर्यतीचा फोटो, 2005.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, वयाने ज्येष्ठ झाल्यानंतरही ड्यूक क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत. सँड्रिंगहमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घोडागाडी शर्यतीचा फोटो, 2005.
line
प्रिन्स फिलीप यांचे नातू प्रिन्स विल्यम यांच्या कॅथरीन मिडलटन यांच्यासोबतच्या विवाहसोहळ्यानंतर या शाही कुटुंबाला बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीमध्ये पाहण्यासाठी पॅलेसबाहेर हजारो लोक जमा झाले होते. 2011

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, प्रिन्स फिलीप यांचे नातू प्रिन्स विल्यम यांच्या कॅथरीन मिडलटन यांच्यासोबतच्या विवाहसोहळ्यानंतर या शाही कुटुंबाला बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीमध्ये पाहण्यासाठी पॅलेसबाहेर हजारो लोक जमा झाले होते. 2011
line
महाराणींच्या डायमंड ज्युबिली सोहळ्यादरम्यान स्पिरीट ऑफ चार्टवेल बार्जवरून अभिवादन करताना ड्यूक ऑफ एडिंबरा. थेम्स नदीतल्या या 80 मिनिटांच्या सोहळ्यात 1000 बोटी सहभागी झाल्या होत्या.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, महाराणींच्या डायमंड ज्युबिली सोहळ्यादरम्यान स्पिरीट ऑफ चार्टवेल बार्जवरून अभिवादन करताना ड्यूक ऑफ एडिंबरा. थेम्स नदीतल्या या 80 मिनिटांच्या सोहळ्यात 1000 बोटी सहभागी झाल्या होत्या.
line
महाराणींसोबत नॉदर्न आयर्लंडच्या टूरदरम्यान बेलफास्टमधल्या हिल्सबरो कॅसलच्या व्हिजीटर्स बुकमध्ये लिहीताना. 2014

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, महाराणींसोबत नॉदर्न आयर्लंडच्या टूरदरम्यान बेलफास्टमधल्या हिल्सबरो कॅसलच्या व्हिजीटर्स बुकमध्ये लिहीताना. 2014
line
महाराणींच्या राज्याभिषेक सोहळ्याला 60 वर्ष झाल्यानिमित्त वेस्टमिनिस्टर अॅबेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्च सर्व्हिसदरम्यान, जून 2013

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, महाराणींच्या राज्याभिषेक सोहळ्याला 60 वर्ष झाल्यानिमित्त वेस्टमिनिस्टर अॅबेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्च सर्व्हिसदरम्यान, जून 2013
line
महाराणींसोबत नॉदर्न आयर्लंडच्या टूरदरम्यान बेलफास्टमधल्या हिल्सबरो कॅसलच्या व्हिजीटर्स बुकमध्ये लिहीताना. 2014

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, महाराणींसोबत नॉदर्न आयर्लंडच्या टूरदरम्यान बेलफास्टमधल्या हिल्सबरो कॅसलच्या व्हिजीटर्स बुकमध्ये लिहीताना. 2014
line
70व्या व्हिक्टरी इन युरोप डे सोहळ्यादरम्यान, विंडसर कॅसल येथे महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्यासोबत.

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, 70व्या व्हिक्टरी इन युरोप डे सोहळ्यादरम्यान, विंडसर कॅसल येथे महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्यासोबत.
line
ड्यूक आणि त्यांचे सुपुत्र चार्ल्स यांच्यातला एक खेळकर क्षण. पाँडबरी येथे महाराणींनी क्वीन मदर, म्हणजे त्यांच्या आईच्या पुतळ्याचं अनावरण केलं. ऑक्टोबर 2016

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, ड्यूक आणि त्यांचे सुपुत्र चार्ल्स यांच्यातला एक खेळकर क्षण. पाँडबरी येथे महाराणींनी क्वीन मदर, म्हणजे त्यांच्या आईच्या पुतळ्याचं अनावरण केलं. ऑक्टोबर 2016
line
बेडफर्डशरमधल्या प्राणीसंग्राहलयाल्या हत्तींसाठीच्या नवीन केंद्राचं उद्घाटन. एप्रिल 2017. सावर्जनिक कार्यक्रमांतून वयाच्या 95व्या वर्षी निवृत्ती घेत असून, याला महाराणींचा दुजोरा असल्याचं त्यांनी मे महिन्यात जाहीर केलं.

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, बेडफर्डशरमधल्या प्राणीसंग्राहलयाल्या हत्तींसाठीच्या नवीन केंद्राचं उद्घाटन. एप्रिल 2017. सावर्जनिक कार्यक्रमांतून वयाच्या 95व्या वर्षी निवृत्ती घेत असून, याला महाराणींचा दुजोरा असल्याचं त्यांनी मे महिन्यात जाहीर केलं.
line
मँचेस्टरमध्ये आरियाना ग्रँडे कॉन्सर्टदरम्यान मारले गेलेल्यांना श्रद्धांजली वाहताना. बकिंगहॅम पॅलेस 23 मे 2017.

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, मँचेस्टरमध्ये आरियाना ग्रँडे कॉन्सर्टदरम्यान मारले गेलेल्यांना श्रद्धांजली वाहताना. बकिंगहॅम पॅलेस 23 मे 2017.
line
ड्यूक ऑफ एडिंबरा हे ब्रिटीश राजघराण्यात सगळ्यात जास्त काळ राजगादीवर असणाऱ्या महाराणी एलिझाबेथ यांचे पती होते.

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, ड्यूक ऑफ एडिंबरा हे ब्रिटीश राजघराण्यात सगळ्यात जास्त काळ राजगादीवर असणाऱ्या महाराणी एलिझाबेथ यांचे पती होते.
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त