प्रिन्स फिलिप यांना उपचारांसाठी काही काळ हॉस्पिटलमध्ये रहावं लागणार

Prince Philip seen in July 2020

फोटो स्रोत, Getty Images

एडिनबर्गचे ड्यूक प्रिन्स फिलिप यांना संसर्ग झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. उपचारासाठी त्यांना आता काही दिवस हॉस्पिटलमध्येच रहावं लागणार आहे, अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली आहे.

प्रिन्स फिलिप यांना अस्वस्थ वाटल्याने 17 फेब्रुवारीला लंडनच्या किंग एडवर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

99 वर्षीय प्रिन्स फिलिप राणी एलिझाबेथ यांचे पती आहेत. बकिंगहॅम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स फिलिप यांची प्रकृती आता बरी असून ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे.

प्रिन्स फिलिप आणि राणी एलिझाबेथ यांना जानेवारी महिन्यात कोरोनाची लस देण्यात आली होती. दरम्यान, कोरोनामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले नाही.

प्रिन्स एडवर्ड यांनी स्काय न्यूजला सांगितलं, "ते हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सर्वांत सकारात्मक गोष्ट आहे."

प्रिन्स फिलिप आणि राणी एलिझाबेथ यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाचा 73 वा वाढदिवस साजरा केला. प्रिन्स फिलिप जून महिन्यात 100 वर्षांचे होतील.

प्रिन्स चार्ल्स यांनी 20 फेब्रुवारीला आपल्या वडिलांची भेट घेतली. जवळपास 30 मिनिटं ते हॉस्पिटलध्ये होते.

प्रिन्स फिलिप

फोटो स्रोत, PA

क्लॅरन्स हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, प्रिन्स चार्ल्स भेटीनंतर ग्लॉस्टरशायर येथील आपल्या हायग्रोव्ह निवासस्थानी परतले.

आपल्या आजोबांची तब्येत बरी असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत नजर ठेऊन आहेत अशी माहिती 22 फेब्रुवारीला ड्यूक ऑफ केंब्रिजने दिली आहे.

राजघराण्यातील सदस्य आपल्या अधिकृत जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. राणीने 18 फेब्रुवारीला विंडसरमध्ये एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

प्रिन्स फिलिप 2017 मध्ये शाही जबाबदाऱ्यांमधून निवृत्त झाले होते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त टिप्पणीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रिन्स फिलिप यांनी त्यावेळी गमतीत म्हटलं की ते "जगातील सर्वात अनुभवी फलक अनावरणकर्ते" आहेत.

राजघराण्याच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 22 हजारहून अधिक कार्यक्रमांना हजेरी लावली आणि 5 हजारपेक्षा जास्त भाषणं दिली.

गेल्या काही वर्षांत त्यांच्यावर विविध आरोग्य विषयक समस्यांसाठी उपचार करण्यात आले आहेत.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)