अमेरिका कॅपिटल हल्ला : ट्रंप यांना पदावरून हटवलं जाऊ शकतं का?

ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

जगातली सर्वात शक्तीशाली लोकशाही मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत लोकशाहीतली एक प्रक्रिया धोक्यात आली होती.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या समर्थकांनी अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टन डीसी शहरातल्या कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसत हिंसाचार केला.

अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या आधीपासून ते निकाल आल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कायम त्यांचाच विजय झाल्याचा दावा करत होते. आपला पराभव झाल्यास आपण तो सहजासहजी स्वीकारणार नसल्याचं त्यांनी निवडणुकीपूर्वीच म्हटलं होतं.

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि जो बायडन यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेची वेळ येऊन ठेपल्यानंतरही ट्रंप त्यांच्या म्हणण्यावर अडून होते.

या निवडणुदरम्यान दगाफटका आणि घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी वारंवार केला, पण आपल्या दाव्यांचं समर्थन करणारे कोणतेही पुरावे त्यांनी दिले नाहीत.

कॅपिटल बिल्डिंगमधली घुसखोरी आणि हिंसेनंतरही ट्रंप त्यांच्या मतावर ठाम आहेत. आपण 20 जानेवारीला योग्यरीतीने सत्तेचं हस्तांतरण करू पण असं असलं तरी या निवडणुकीच्या निकालाशी आपण सहमत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

ट्रंप यांच्या या भूमिकेवर जगभरातून टीका करण्यात आली आणि अमेरिकेतल्या स्थितीविषयी काळजी व्यक्त करण्यात आली.

अमेरिकेमध्ये एकीकडे 20 जानेवारीला नव-नियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन पदाची शपथ घेतील तर दुसरीकडे अमेरिकेत अप्रत्यक्षरित्या अराजकतेचं वातावरण आहे.

20 जानेवारीला ट्रंप यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच त्यांना पदावरून हटवलं जाऊ शकतं का, याची चर्चा सध्या सुरू आहे. अमेरिकन घटनेतल्या 25व्या सुधारणेच्या मदतीने असं करता येईल का, असा सवाल केला जातोय.

पदावर असणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना काढण्यासाठी अमेरिकन संसदेत महाभियोग प्रक्रिया वापरली जाते. पण या 25व्या सुधारणेच्या मदतीने एखाद्या राष्ट्राध्यक्षाचं स्वतःचंच मंत्रिमंडळ म्हणजेच कॅबिनेट त्यांना पदावरून हटवू शकतं.

1963 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांच्या हत्येच्या दोन तासांनंतर उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती.

फोटो स्रोत, Universal History Archive/Getty Images

फोटो कॅप्शन, 1963 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांच्या हत्येच्या दोन तासांनंतर उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती.

अमेरिकेला 25व्या सुधारणेची गरज का भासली?

'कॉन्स्टिट्यूशन डेली' या अमेरिकन राज्यघटनेशी संबंधित विषयांवर काम करणाऱ्या वेबसाईटनुसार 1963 साली अमेरिकेच्या घटनेमध्ये 25वी सुधारणा करण्यात आली. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांची हत्या करण्यात आल्यानंतर घटनेत ही सुधारणा करण्याची गरज भासली होती.

जॉन एफ. केनडी यांच्या हत्येच्या वेळी उप-राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सनही जखमी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दुःखात बुडलेल्या अमेरिकेत त्यावेळी काही काळासाठी राजकीय संकट निर्माण झालं होतं.

पण केनडींच्या हत्येनंतर दोनच तासांत लिंडन जॉन्सन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आणि इथपासूनच 25व्या सुधारणेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

केनडींच्या हत्येच्या दोन वर्षांनी 1965मध्ये अमेरिकन संसदेने 25व्या सुधारणेचा प्रस्ताव मांडला आणि 1967मध्ये याला मंजुरी देण्यात आली.

राष्ट्राध्यक्षांची अचानक हत्या झाली, निधन झालं, त्यांनी राजीनामा दिला किंवा मग ते पद सांभाळायला असमर्थ ठरले तर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, हे ठरवणारी कोणतीही तरतूद त्यापूर्वी अमेरिकेच्या घटनेत नव्हती.

अमेरिकेचं संविधान

फोटो स्रोत, stock photo/Getty

25वी सुधारणा काय आहे?

या 25व्या सुधारणेच्या आधारे राष्ट्राध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी मंत्रिमंडळाला बहुमताने आणि उप-राष्ट्राध्यक्षांसोबत मिळून, सध्याचे राष्ट्राध्यक्ष आपल्या कर्तव्यांचं पालन करायला सक्षम नाहीत, अशा आशयाच्या पत्रावर स्वाक्षऱ्या कराव्या लागतात.

थोडक्यात सांगायचं तर राष्ट्राध्यक्ष आपला कार्यभार सांभाळायला असमर्थ असल्याची घोषणा कॅबिनेट आणि उप-राष्ट्राध्यक्षांना करावी लागते.

जर एखादे राष्ट्राध्यक्ष कामकाज करायला सक्षम राहिले नसूनही पद सोडण्यासाठी स्वेच्छेने पावलं उचलत नसतील तर अशा परिस्थितीत 25व्या सुधारणेतल्या चौथ्या कलमाचा आधार घेता येऊ शकतो.

पण या चौथ्या कलमाकडे राष्ट्राध्यक्षांमधल्या शारीरिक वा मानसिक अपंगत्त्वाच्या परिस्थितीत वा संदर्भातूनच पहायला हवं, असं काही घटना तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

पण राष्ट्राध्यक्षांच्या शारीरिक आणि मानसिक अपंगत्वाच्या पुढे जाऊन या चौथ्या कलमाकडे व्यापक अर्थाने पाहण्याची गरज असल्याचं काही जाणकार सांगतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

राष्ट्राध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठीची पूर्ण प्रक्रिया काय आहे?

कॅबिनेटचं बहुमत आणि उप-राष्ट्राध्यक्षांच्या मंजुरीने पत्रावर सह्या झाल्यानंतर उप-राष्ट्राध्यक्षच कार्यकारी राष्ट्राध्यक्ष होतात.

यादरम्यान राष्ट्राध्यक्षांना स्वतःचा बचाव लेखी स्वरूपात मांडण्याची एक संधी दिली जाते.

पण जर राष्ट्राध्यक्षांनी या निर्णयालाच आव्हान दिलं, तर याविषयीचा अंतिम निर्णयही मंत्रिमंडळच घेतं.

सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे जायच्या आधी सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हजमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळावं लागतं. पण यासगळ्या दरम्यान उपाध्यक्ष हे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करत राहतात.

कॅपिटल बिल्डिंग

फोटो स्रोत, Thinkstock

ट्रंप यांना या प्रक्रियेने हटवलं जाऊ शकतं का?

उपाध्यक्ष माईक पेन्स हे कधीही डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात जाणार नाहीत, असं वाटल्याने असं होण्याची शक्यता आतापर्यंत कमी वाटत होती. पण जो बायडन आणि कमला हॅरिस यांना अमेरिकन जनतेने निवडून दिलं असल्याचं आता माईक पेन्स यांनी जाहीरपणे म्हटलंय.

ट्रंप यांचा दबाव असला तरी ते अमेरिकेच्या जनादेशाच्या विरोधात जाणार नाहीत, असंही पेन्स यांनी बोलून दाखवलं,

यानंतरच 25व्या सुधारणेच्या पर्यायाच्या चर्चेने जोम धरला. या कलमाचा वापर करण्यात आला तर डोनाल्ड ट्रंप हे घटनेच्या 25व्या सुधारणेच्या मदतीने पदावरून दूर करण्यात आलेले, अमेरिकेच्या इतिहासातले पहिले राष्ट्राध्यक्ष असतील. यापूर्वी कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अशा पद्धतीने पदावरून हटवण्यात आलेलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)