अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत हिंदू भारतीय मतदारांना किती महत्त्व?

कमला हॅरिस

फोटो स्रोत, DREW ANGERER

    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, वॉशिंग्टनहून

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रेटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकेतल्या भारतीयांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले आहे.

यामध्ये त्यांनी अमेरिकेतील भारतीयांना काही आश्वासने दिली आहेत. ते म्हणाले, "कोरोनाच्या निमित्तानं उद्भवलेल्या आरोग्य संकटाचा सामना करण्यापासून ते अर्थव्यवस्थेला उभारी देण्यापर्यंत आणि स्थलांतराशी संबंधित सुधारणांबाबत अमेरिकेतील भारतीय जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्यावर विश्वास ठेऊ शकतात."

आगामी निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. यापूर्वी जो बायडन यांनी अमेरिकन मुसलमानांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले होते. यामध्ये काश्मीर प्रश्न आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविषयी नमूद करण्यात आलं होतं. या व्हिजन डॉक्युमेंटवर काही अमेरिकन भारतीय नाराज होते.

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी अमेरिकन भारतीयांसाठी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला होता. भारतीय आणि अमेरिकन मिळून देशाचा विकास करू शकतात, असा विश्वास या व्हीडिओतून व्यक्त करण्यात आला.

अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकन भारतीयांचा, त्यातही विशेषत: कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारांचा कल विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. कारण त्यांच्याकडे भारताचे समर्थक म्हणून पाहिले जाते. काश्मीर आणि वादग्रस्त नागरिकत्व संशोधन कायद्याप्रकरणी ट्रंप प्रशासनाने शांत राहणे पसंत केले. पण डेमोक्रेटिक नेत्या प्रमिला जयपाल आणि बर्नी सँडर्स हे या विषयांवर आपली भूमिका मांडत राहिले.

शिवाय, सप्टेंबर 2019 मध्ये अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये ट्रंप यांचा सहभाग आणि याच वर्षी झालेली ट्रंप यांची भारत भेट त्यांच्यासाठी भारतीय अमेरिकन मतांच्या दृष्टीने फायद्याची ठरू शकते.

काही डेमोक्रेटिक नेत्यांच्या वक्तव्यांचा फायदा ट्रंप यांना होऊ शकतो, असंही अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका वर्गाला वाटतं.

अमेरिकेतील भारतीयांसाठी व्हिजन डॉक्युमेंटमध्ये काय आहे?

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी उप-राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दोन्ही देशांमध्ये आणि परिसरात दहशतवादाच्या मुद्यावर सहकार्य वाढवण्यासाठी काम केले आहे. दक्षिण आशियातील दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असा निर्धार बायडन यांनी व्यक्त केला.

भारतासोबत बायडन प्रशासन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून चीनसह इतर कोणताही देश शेजारील देशांसाठी धोका निर्माण करू शकणार नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

अमेरिकेत हिंदू, शीख, मुस्लीम, जैन आणि इतर धर्मांच्या भारतीय वंशाच्या नागरिकांविरोधात वंशिक हिंसाचार वाढला आहे. अशा परिस्थितीत वॉशिंग्टनमध्ये असलेल्या नेत्यांचे सहकार्य त्यांना लाभेल असा विश्वास देणं गरजेचे आहे.

बायडन द्वेष प्रेरित हल्ल्यांच्या विरोधात आहेत. तेव्हा राष्ट्राध्यक्ष या नात्याने अशा घटनांचा विरोध तर केला जाईलच. पण अशा गुन्हेगारांना शस्त्र खरेदी आणि शस्त्र बाळगण्यावर बंदी घालणारा कायदा आणला जाईल.

देशाच्या स्थलांतराच्या नियमांमध्ये कौटुंबिक एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. कौटुंबिक व्हिसा प्रलंबित ठेवले जाणार नाहीत. देशाची अर्थव्यवस्था पाहता कायमस्वरुपी नोकरी आणि त्यासाठी व्हिसाची मर्यादा वाढवण्यात येईल. विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरींग आणि गणित क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी पीएचडी केलेल्या इच्छुक उमेदवारांवरील बंदी हटवण्यात येईल.

कुशल लोकांसाठी तात्पुरत्या व्हिसा नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. देशांवर आधारित मर्यादित ग्रीन कार्डची संख्या वाढवली जाईल.

अमेरिकन मुसलमानांच्या व्हिजन डॉक्युमेंटमुळे नाराजी

जो बायडन यांनी अमेरिकन मुसलमानांसाठी प्रसिद्ध केलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये काश्मीर प्रश्न आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीचा उल्लेख करण्यात आला होता. यामुळे काही प्रमाणात भारतीय अमेरिकन्समध्ये नाराजी होती.

कमला हॅरिस यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांशी या निवडणूक प्रचाराच्या व्हीडिओकडे पाहत आहेत. या संदर्भात अनेक व्हीडिओ यूट्यूबवरही उपलब्ध आहेत.

जो बायडन, कमला हॅरिस

फोटो स्रोत, EPA

या व्हीडिओमध्ये बायडन यांनी, "काश्मीरच्या लोकांचे अधिकार त्यांना मिळावेत यासाठी भारत सरकारने शक्य ते केले पाहिजे," असे विधान केले आहे.

"शांततेच्या मार्गाने जाहीर केला जाणारा विरोध, इंटरनेट बंद किंवा त्याचा वेग कमी करणं अशी पावलं उचलल्याने लोकशाही कमकुवत होते."

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याप्रकरणी आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांबाबत कमला हॅरिस यांची भूमिका भारत सरकारच्या विरोधात आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये टेक्सासमधील ह्युस्टन येथे आयोजित कार्यक्रमात कमला हॅरिस यांना काश्मीरमध्ये फोन आणि इंटरनेटवर घालण्यात आलेल्या बंदीविषयी तसंच लोकांना ताब्यात घेतल्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, "आम्ही लोकांना सांगू इच्छितो की ते एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहोत. एक राष्ट्र या नात्याने मानवी हक्कांच्या उल्लंघनावर बोलत राहणं आपलं काम आहे. गरज भासल्यास आम्ही दखलही घेतो."

"आसाममध्ये एनआरसी लागू करण्याविषयी आणि नागरिकता संशोधनाच्या प्रस्तावित मसुद्याचे कायद्यात रुपांतर करण्याचा भारत सरकारचा निर्णय जो बायडन यांना दुर्देवी वाटतो." अशीही भूमिका या व्हिडिओमध्ये मांडण्यात आली आहे.

बायडन यांच्यासमोर मोठी आव्हानं

हा व्हीडिओ प्रसिद्ध केल्यानंतर अमेरिकेतल्या हिंदूंनीही निवडणुकीसाठी अशाच प्रकारच्या आश्वासनात्मक व्हीडिओची मागणी केली. बायडन यांच्या निवडणूक मोहिमेनुसार अमेरिकेत जवळपास 13.1 लाख भारतीय अमेरिकन आहेत. त्यांची मतं आठ मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात.

बायडन यांच्या निवडणूक मोहिमेत काश्मीर आणि एनआरसीच्या उल्लेखानंतर आता अमेरिकन भारतीयांकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे.

14 आणि 15 ऑगस्टला बायडन यांनी अमेरिकन भारतीय आणि पाकिस्तानींसाठी एका व्हर्च्यूअल कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जो बायडन, डोनाल्ड ट्रंप

दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तयारीत असलेल्या ट्रंप यांनाही मोठ्या संख्येने भारतीय अमेरिकन मतांचे समर्थन लाभेल अशी आशा आहे.

ट्रंप व्हिक्ट्री इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटीच्या एका अहवालानुसार, "अमेरिकन भारतीयांची जवळपास अर्धी मतं बायडन यांच्याऐवजी ट्रंप यांच्याकडे जाऊ शकते."

एका विश्लेषणानुसार, "भारतात मुसलमानांसोबत जे काही होत आहे ते जग पाहत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आमच्या प्रतिमेला धक्का बसतोय. लिंचिंग, लोकांचा जीव घेणं, हे आपल्या प्रतिमेचा भाग बनत चाललाय."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)