#Metoo : हार्व्हे वाईनस्टाईन महिलांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी

हार्व्हे वाइनस्टीन

फोटो स्रोत, Getty Images

हॉलिवुड चित्रपट निर्माते हार्व्हे वाईनस्टाईन महिलांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी आढळले आहेत. हॉलिवुडमधील अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा ठपका वाईनस्टाईन यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतरच अमेरिकेत #MeToo चळवळीला सुरुवात झाली होती.

हार्व्हे वाईनस्टाईन यांनी आपलंही लैंगिक शोषण केलं आहे, असं म्हणत नंतर काही महिला समोर आल्या होत्या. त्यानंतर इतर पुरुषांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असं म्हणत अनेक महिलांनी त्यांच्यावर बेतलेले प्रसंग समोर आणले. त्यानंतर #Metoo चळवळ पाश्चिमात्य देशात पसरली. भारतातही या चळवळीने जोर धरला होता.

हार्व्हे वाईनस्टाईनवर दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाला आहे. बलात्कार आणि लैंगिक हल्लाच्या प्रकरणात अद्याप सुनावणी सुरू आहे.

हॉलिवुडमधील किमान 80 महिलांनी हे सांगितलं होतं की हार्व्हे वाईनस्टाईन यांनी आपलं लैंगिक शोषण केलं आहे. त्यात प्रसिद्ध सिनेतारकांचाही समावेश होता.

या दोन प्रकरणात हार्व्हे वाईनस्टाईन यांना 25 वर्षांची शिक्षा होणार आहे. जर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)