धावपट्टीवर उतरताना बोईंग विमान नदीत कोसळलं, प्रवासी सुरक्षित

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतल्या फ्लोरिडा येथे प्रवाशी विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरून जवळच्या नदीत कोसळलं. वादळामुळे बोईंग विमान धावपट्टीवरून घसरलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या विमानात 143 प्रवाशी होते. त्यापैकी सर्व सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
हे विमान Miami Air International या कंपनीचं होतं. ते क्युबामधल्या गँटानामो बे येथून निघून जॅक्सनविले शहरातल्या लष्करी विमानतळावर उतरणार होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
वादळी वाऱ्यामुळे विमान धावपट्टीवर न उतरता जवळच्या सेंट जॉन्स या नदीत उतरलं. विमानातले 20 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या दवाखान्यात उपचार चालू आहे.
धावपट्टीवरून विमान घसरतानाचा अनुभव 'भयंकर' होता, असं चेरिल बोरमन महिला प्रवाशानं CNN TVला सांगितलं.
"विमान अक्षरश: जमिनीवर आदळलं आणि नंतर उडालं. विमानावर वैमानिकाचा पूर्ण ताबा नव्हता हे दिसून येत होतं. ते आणखी एकदा उडालं," असं त्यांनी सांगितलं.
आम्ही पाण्यात होतो तेव्हा नेमकं नदीत आहोत की समुद्रात हेच कळलं नाही, असंही त्यांनी सांगितलं. पाण्याला इंधनाचा वास येत होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)