कॅथेड्रल नोत्र-दाम : आगीत भस्मसात झालेला वारसा पुन्हा उभारण्याचं आव्हान

चर्च

फोटो स्रोत, Reuters

पॅरिसमधल्या सीन नदीच्या काठावर आगीच्या भक्षस्थानी पडलेलं नोत्र दाम कॅथेड्रलला पुन्हा उभा करण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू होत आहे. अनेकांनी हे कॅथेडरल पुन्हा उभं करण्यासाठी मदत देऊ केली आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी ही इमारत पुन्हा बांधू असं म्हटलं आहे. तर दोन फ्रेच उद्योग समुहांनी 300 दक्षलक्ष युरोची मदत देऊ केली आहे. तर युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी इतर युरोपियन राष्ट्रांना मदतीचे आवाहन केलं आहे. ही इमारत पुन्हा कशी बांधायची याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.

या इमारतीला लागलेल्या आगीचं कारण समजू शकलेलं नाही.

या इमारतीचं किती नुकसा झालं असावं याबद्दल अंदाज बांधले जात आहेत. अग्निशमन दलाच्या प्रवक्त्यांनी छत पूर्णपणे आगीत भस्मसात झाल्याचं म्हटलं आहे. इमारतीचं व्हॉल्ट अर्ध नष्ट झालं आहेत.

पॅरिस

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, डाव्या बाजूचा फोटो मागच्या वर्षी घेतला होता. आज या आगीने या वास्तूची अशी स्थिती झाली आहे.

Gucci आणि Yves Saint Laurent या ब्रॅंडचे मालक असलेले फ्रॅकाईस हेन्री पिनॉल्ट यांनी ही इमारत पुन्हा बांधण्यासाठी 100 दशलक्ष युरोची मदत देऊ केली आहे. तर LVMH या कंपनीचे बनार्ड अरनॉल्ट कुटुंबीयांनी 200 दशलक्ष युरोची मदत देऊ केली आहे. तसेच फ्रान्समधील धर्मादाय संस्था Fondation du Patrimoine या संस्थेनेही मदतीचे आवाहन केलं आहे.

पॅरिस

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, या वास्तूचा मनोरा आगीत भस्मसात झाला.

मॅक्रॉन यांनी या वास्तूला भेट दिली. ते म्हणाले, "यापेक्षाही वाईट घडलं असतं. सुदैवाने ते टळलं आहे. ही वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी जगभरातून निधी उभा केला जाईल. "

पॅरिस

फोटो स्रोत, AFP

रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुटिन यांनी हे कॅथेड्रल बांधण्यासाठी मदत करू असं म्हटलं आहे.

पॅरिस

फोटो स्रोत, EPA

पॅरिस

फोटो स्रोत, AFP

ब्रिटन सरकारही कशा प्रकारे या वास्तूला मदत करता येईल, हे पाहत आहे.

पॅरिस

फोटो स्रोत, AFP

पॅरिस

फोटो स्रोत, AFP

स्पेनचे सांस्कृतिक मंत्री जोन्स गुएरो यांनी या क्षणाला सर्वात जास्त गरज ही नैतिक आधाराची आहे, स्पेन सरकार या इमारतीला कशी मदत करता येईल ते पाहत आहे, असं म्हटलं आहे.

पॅरिस

फोटो स्रोत, Reuters

पॅरिस

फोटो स्रोत, AFP/Getty

पॅरिस

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, या घटनेमुळे फ्रेंच लोकांच्या मनावर दीर्घकालीन परिणाम होईल
पॅरिस

फोटो स्रोत, AFP

सर्व फोटोंचे हक्क सुरक्षित

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)