किम जाँग आणि डोनाल्ड ट्रंप यांची दुसरी भेट लवकरच

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्यासोबत दुसरी भेट लवकरच होईल, अशी घोषणा केली आहे. दोन्ही देशांतील संबंध अतिशय चांगले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी ट्रंप यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
वर्षाभरापूर्वी दोन्ही नेते अण्वस्त्रांच्या वापराची भाषा करत होते. पण जूनमध्ये त्यांच्यात पहिली भेट झाली. त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत.
दुसऱ्या भेटीचं ठिकाण ठरलेलं नाही, असं ते म्हणाले.
मून यांनी नुकताच पोंगयांगचा 3 दिवसांचा दौरा केला. त्यामध्ये त्यांनी किम यांची भेट घेतली. दक्षिण कोरियाच्या नेत्याने पोंगयांगचा दौरा करण्याची या दशकातील ही पहिलीच वेळ होती.
मून म्हणाले, "किम यांनी अण्वस्त्र निशस्त्रीकरणाचा मुद्दा मान्य केला आहे, शिवाय ट्रंप यांनी भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे."

फोटो स्रोत, Reuters
जून महिन्यात सिंगापूरमध्ये ट्रंप आणि किम यांची भेट झाली. नवे संबंध प्रस्थापित करणं आणि अण्वस्त्र निशस्त्रीकरणाचे करार दोघांत झाले. पण या करारांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. यानंतर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाशी असलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातून अजूनही ठोस काही झालेलं नसलं तरी उत्तर कोरियाने देशातील क्षेपणास्त्र चाचणी स्थळ बंद केलं आहे.
या घडामोडी घडत असताना उत्तर कोरियातील मानवी हक्कांच्या पायमल्लीकडं दुर्लक्ष केलं होत आहे, अशी टीकाही होत आहे.
तर दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारात सुधारणा करण्यात आल्या असून यामुळे अमेरिकेतील वाहन आणि औषधनिर्माण कंपन्या यांना नवी संधी मिळणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








