शाही विवाह सोहळा संपन्न

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्जेस चॅपलमध्ये संपन्न झाला. त्या दोघांनी एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्वीकार केला. मात्र, शाही विवाह सोहळ्यात शपथ घेताना मेगन मार्कल यांनी पतीच्या सगळ्या आज्ञांचं पालन करीन अशी शपथ घेतली नाही. तर, अंगठी घालून प्रिन्स हॅरी यांनी राजघराण्याची आजवरची परंपराही मोडली.

विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्जेस चॅपल मध्ये या सोहळ्यासाठी राणी एलिझाबेथ आणि 600 निवडक आमंत्रित उपस्थित होते.

शाही विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. त्याची क्षणचित्रे आणि अधिक माहिती शाही विवाह सोहळा संपन्न इथे वाचता येईल.

या दिग्गजांसह 600 आमंत्रित पाहुणे या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्जेस चॅपेल इथे हा सोहळा पार पडला.

प्रिन्स हॅरी यांना 'अर्ल ऑफ डंबार्टन' आणि 'बॅरोन किलकील' हे किताब मिळाले आहेत.

हा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारोंनी चाहते विंडसर कॅसल परिसरात सकाळपासून दाखल झाले आहेत.

तर, शेकडोंनी आदल्या दिवशी रात्रीपासून चांगली जागा पटकावण्यासाठी विवाहस्थळ गाठले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)