Oscars 2018 : कोणते सिनेतारे, कोणता चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट?

शेप ऑफ वॉटर ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
फोटो कॅप्शन, शेप ऑफ वॉटर ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

चित्रपटविश्वातील प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'द शेप ऑफ वॉटर' सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. चित्रपटाचे दिग्दर्शक गिलर्मो डेल टोरो हेही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या ऑस्करचे मानकरी ठरले.

लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या 90व्या अकादमी अवॉर्ड सोहळ्यात भारतीय अभिनेते श्रीदेवी आणि शशी कपूर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या 'शेप ऑफ वॉटर'ला सर्वाधिक 13 मानांकनं मिळाली होती, तर ख्रिस्तोफर नोलनच्या डन्कर्क या युद्धपटाला आठ विविध गटांत मानांकनं मिळाली होती.

डन्कर्कने तीन ऑस्कर पटकावले. याव्यतिरिक्त 'थ्री बिलबोर्ड्स आउटसाईड एबिंग, मिसोरी'ला सात विविध गटांमध्ये मानांकनं होती.

कोणाला मिळतेय ही सोन्याची बाहुली आज?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोणाला मिळतेय ही सोन्याची बाहुली आज?

गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पुरस्कार जाहीर करताना गफलत झाली होती. विजेता चित्रपट आणि जाहीर झालेला चित्रपट वेगळा असल्याने गोंधळ उडाला होता. यावर्षी असं होणार नाही, असं यंदाच्या ऑस्कर सोहळ्याचं सूत्रसंचालन करणाऱ्या जिमी कमेल ने म्हटलं.

लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या हॉलिवुड निर्माते हार्वे वाईनस्टीन यांचाही संदर्भ जिमी यांनी दिला. कोणतीही वाईट वागणूक यापुढे सहन केलं जाणार नाही. अख्खं जग आपल्याला पाहत आहे. आपण लोकांसमोर चांगला आदर्श ठेवणं अपेक्षित आहे, असं जिमी यांनी सांगितलं.

आणि मग पुरस्कार जाहीर होण्यास सुरुवात झाली...

जाहीर पुरस्कार यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट- द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर स्वीकारताना 'द शेप ऑफ वॉटर'चे दिग्दर्शक गिलर्मो डेल टोरो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर स्वीकारताना 'द शेप ऑफ वॉटर'चे दिग्दर्शक गिलर्मो डेल टोरो

'कॉल मी बाय युअर नेम', 'डार्केस्ट अवर', 'डन्कर्क', 'गेट आऊट', 'लेडी बर्ड', 'फँटम थ्रेड', 'द पोस्ट', 'थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड इबिंग, मिसौरी' असे एकापेक्षा एक चित्रपट शर्यतीत होते. मात्र या सगळ्यांना मागे टाकत द शेप ऑफ वॉटरने बाजी मारली.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- फ्रान्सेस मॅकडॉरमंड
फोटो कॅप्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- फ्रान्सेस मॅकडॉरमंड

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- फ्रान्सेस मॅकडॉरमंड, थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड बिंग, मिसौरी

गॅरी ओल्डमन, डार्केस्ट अवर
फोटो कॅप्शन, गॅरी ओल्डमन, डार्केस्ट अवर

सर्वोत्कृष्ट अभिनेता- गॅरी ओल्डमन, डार्केस्ट अवर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : गिलर्मो डेल टोरो, द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग- रिमेंबर मी, कोको

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर - द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ब्लेड रनर 2049

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले- गेट आऊट

सर्वोत्कृष्ट अडॅप्टटेड स्क्रीनप्ले- कॉल मी बाय युअर नेम

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट- द सायलेंट चाइल्ड

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट- हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन द 405

सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- डन्कर्क

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- ब्लेड रनर 2049

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर - कोको

सर्वोत्कृष्ट बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट - डिअर बास्केटबॉल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जेनी

ऑस्कर, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अॅलिसन जेनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार स्वीकारताना

सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतली फिल्म - अ फँटास्टिक वुमन (चिली)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग- डन्कर्क

सर्वोत्कृष्ट साउंड एडिटिंग- डन्कर्क

सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइन- फँटम थ्रेड

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल- डार्केस्ट अ

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी (फीचर)- इकारस

ऑस्कर, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सॅम रॉकवेल या अभिनेत्याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीचा पुरस्कार पटकावला.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सॅम रॉकवेल, थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड एबिंग, मिसौरी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)