आमची परीक्षा पाहू नका : ड्रोनचे अवशेष दाखवत नेतान्याहूंचा इराणला इशारा

नेतान्याहू बेंजामिन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, नेतान्याहू बेंजामिन

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्युनिक इथं आयोजित सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये इराणावर हल्लाबोल केला. इराण हा जगाला सर्वांत मोठा धोका असल्याचा आरोप त्यांनी केला.

बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं की, इराणी नेतृत्वाला इस्राईलमध्ये दहशतवाद घुसवू देणार नाही. त्यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद जरिफ यांच्यावर टीका करताना सांगितलं की, ते उत्तम वक्ते आहेत. पण ते असत्य बोलतात. जरिफ या बैठकीत इराणचं प्रतिनिधित्व करत आहेत. पण त्यांनी अद्याप बैठकीस संबोधित केलेलं नाही.

नेतान्याहू यांनी सांगितलं की, मागील आठवड्यात इराणने इस्राईलच्या सीमेत ड्रोन पाठवला होता. हा ड्रोन आमच्या सुरक्षा सैनिकांना हाणून पाडला. पण इराण हा ड्रोन त्यांचा असल्याचं नाकारत आहेत.

त्यांनी नष्ट केलेल्या ड्रोनचा अवशेष हातात उचलून दाखवला आणि जरिफ यांच्याकडे बघून म्हणाले, "तुम्ही हा ड्रोन ओळखत असालच. तुम्ही ओळखलाच पाहिजे कारण की, हा तुमचाच ड्रोन आहे. आमची परीक्षा घेऊ नका."

बेंजामिन नेतान्याहू यांनीड्रोनचा अवशेषच सादर केला. पाहा हा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्युनिक इथं आयोजित सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये इराणावर हल्लाबोल केला.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)