अमरनाथ ढगफुटी : पुण्यातील दोघांचा यात्रेदरम्यान मृत्यू

फोटो स्रोत, @ANI
जम्मू काश्मीरमधील अमरनाथ या हिंदू धार्मिक तीर्थक्षेत्र परिसरात ढगफुटी झाल्यामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
ढगफुटीनंतर खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली आहे.
बालटाल आणि पहलगामच्या संयुक्त पोलीस कंट्रोल रूमनं ही माहिती बीबीसीला दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
बचावकार्य अद्याप सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मृतांमध्ये पुण्यातील 2 जण
अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत 15 जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
यामध्ये पुण्यातील धायरी येथील सुनीता भोसले या भाविक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळताना काही दगड डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, Twitter
लोकमतच्या बातमीनुसार, ही दुर्घटना घडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी यात्रेत गेलेल्या सुनिता भोसले आपल्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर बोलल्या होत्या.
फोनवर बोलल्यानंतर काही वेळात आई आपल्यात नसल्याची माहिती वडिलांनी फोनवरून मुलाला दिली. या ह्दयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडलं होतं?
ANI नं या वृत्तसंस्थेनं काल या घटनेचा व्हीडिओ त्यांनी ट्विट केला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ANI च्या ट्विटनुसार, 8 जुलैच्या संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यानंतर घटनास्थळी NDRF, SDRF आणि इतर संस्था मदतकार्यासाठी तातडीने पाठवण्यात आल्या आहेत. अडकलेल्या नागरिकांचं बचावकार्यही सुरू करण्यात आलं आहे, अशी माहिती पहलगामच्या पोलीस नियंत्रण कक्षाने दिली आहे.
ही घटना समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
अमित शाह यांनी ट्विट करून म्हटलं की स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य सुरू केलं आहे. नागरिकांचा जीव वाचवणं, याला आपलं प्राधान्य असेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
हेही वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)