Heat Wave : उष्णतेच्या लाटेत शरीराची काळजी घेण्याचे 'हे' आहेत 7 मार्ग

फोटो स्रोत, Getty Images
हवामान विभागाने दोन नवीन प्रकारच्या अति उष्ण हवामानाचा इशारा दिलाय. लोकांनी सूर्यप्रकाशात फिरणे टाळावे, उष्माघातासारख्या गोष्टींपासून सावध राहावे असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.
या उष्णतेच्या लाटेचा शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे.
1) अति उष्णतेचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?
शरीराचं तापमान वाढल्यास रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. याचा परिणाम रक्तदाब कमी होतो. त्यामुळे शरीराकडे रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयाला अतिरिक्त कष्ट पडतात.
यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्याचा परिणाम शरीराला खाज सुटणे किंवा पाय सुजणे, यासारखी सौम्य लक्षणं दिसू शकतात.
त्याचवेळी, अति घाम आल्याने शरीरातील पाणी, क्षार कमी होतात. आणि मुख्य म्हणजे शरीराचं संतुलन बिघडतं.
यात कमी रक्तदाब, थकवा येणे ही लक्षणे सुद्धा समाविष्ट आहेत याशिवाय
- चक्कर येणे.
- मळमळणे.
- शुद्ध हरपणे.
- गोंधळलेली अवस्था.
- स्नायूंमध्ये पेटके येणे.
- डोकेदुखी.
- दरदरून घाम फुटणे.
- थकवा जाणवणे.
ही लक्षणं जाणवतातच पण जर रक्तदाब खूपचं कमी झाला तर हृदयविकाराचा धोका वाढतो.
2) आपलं शरीर अशा प्रकारची प्रतिक्रिया का देतं?
हिमवादळ असो वा उष्णतेची लाट, आपलं शरीर 37.5 सेल्सियस हे शारीरिक तापमान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतं. सामान्यपणे शरीराचे तापमान 37.5 सेल्सियस असतं.
पण जसजसं बाहेरचं तापमान वाढतं तसतसं शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.

फोटो स्रोत, Getty Images
याचा परिणाम असा होतो की, आपल्या सभोवतालची उष्णता कमी करण्यासाठी आपल्या त्वचेजवळ असलेल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावू लागतात. बाह्य़ त्वचेखाली असलेल्या घर्मग्रंथी उत्तेजित होतात. त्यातून घाम यायला सुरुवात होते.
3) उष्माघात झालेला व्यक्ती पाहिल्यास काय करावं ?
जर ती व्यक्ती अर्ध्या तासाच्या आत सामान्य स्थितीत आली तर हा उष्माघात तितकासा गंभीर नसतो. मात्र एखादी अशी व्यक्ती दिसल्यास
- उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड सावलीच्या ठिकाणी हलवा.
- त्यांना झोपवून आणि त्यांचे पाय किंचित वर उचला.
- त्यांना भरपूर पाणी प्यायला द्या - स्पोर्ट्स किंवा रिहायड्रेशन ड्रिंक्स दिले तरी चालते.
- शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने त्यांच्या शरीरावर थंड पाण्याने स्प्रे करा, स्पंजने पुसून घ्या, त्यांना वारा घाला. काखेत किंवा मानेभोवती थंड पट्ट्या ठेवा.
- मात्र एवढं करूनही 30 मिनिटांत रुग्ण सामान्य स्थितीत न आल्यास त्याला उष्माघात झालाय असं समजावं.
उष्माघाताला बळी पडलेल्या लोकांच्या शरीराचं तापमान जास्त असलं तरी त्यांना घाम येणं बंद होतं, त्यांच्या शरीराचं तापमान 40 सेल्सिअसच्या पुढे गेलं असलं तर त्यांना अपस्माराचा झटका येऊ शकतो किंवा ते बेशुद्ध पडू शकतात.
4) उष्माघाताचा सर्वाधिक धोका कोणाला आहे?
वयस्कर व्यक्ती किंवा दीर्घकालीन आजारी व्यक्ती जसं की हृदयविकार, असे लोक आपल्या शरीरावर उष्णतेचा ताण सहन करू शकत नाहीत.
ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांच्या शरीरातील पाणी लवकर कमी होऊ शकतं. तसेच या रोगाच्या गुंत्यामुळे रक्तवाहिन्या आणि घाम येण्याच्या क्षमतेत बदल होऊ शकतो.
लहान मुले देखील अधिक असुरक्षित असू शकतात. मेंदूचे आजार, जसे की स्मृतिभ्रंश झालेले लोक उष्णतेबद्दल अनभिज्ञ असू शकतात किंवा त्याबद्दल ते काहीचं करू शकत नाहीत.
जे लोक बेघर आहेत त्यांनाही उन्हाला सामोरं जावं लागतं. वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनाही जास्त तापमानाचा सामना करावा लागतो.
5) काही औषधांमुळे उष्माघाताचा धोका वाढतो का?
होय. मात्र लोकांनी त्यांची औषधे घेतलीच पाहिजेत. त्याचप्रमाणे शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
लघवीचे प्रमाण वाढवणारी औषध - याला "वॉटर पिल्स" असं ही म्हणतात. अशाऔषधाने शरीरातून पाणी बाहेर ढकलण्याचं प्रमाण वाढतं. हृदयाच्या रुग्णांना अशा प्रकारची औषध घ्यावी लागतात. जर बाहेरचं तापमान वाढलं तर या औषधांमुळे शरीरातील पाणी कमी होण्याचे आणि असंतुलनाचे धोके वाढतात.
अँटीहाइपरटेन्सिव्ह - जी औषध रक्तदाब कमी करतात - उष्णतेचा सामना करण्यासाठी प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्यांशी संयोग होऊन रक्तदाबाची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
एपिलेप्सी आणि पार्किन्सन्ससाठी असणारी औषधे घाम येण्यापासून रोखतात. अशात जर उष्माघाताचा त्रास झाल्यास शरीर थंड करणं कठीण होऊन बसतं.
आणि इतर औषधं जसं की लिथियम किंवा स्टॅटिन मोठ्या प्रमाणात कॉन्सन्ट्रेटेड झाल्यास रक्तातील द्रवपदार्थ कमी होऊन समस्या निर्माण होऊ शकतात.
6) उष्णतेमुळे जीव जाऊ शकतो का?
होय. उच्च तापमानामुळे इंग्लंडमध्ये दरवर्षी सुमारे 2,000 लोक मृत्युमुखी पडतात.
शरीराचे तापमान स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नात यापैकी बहुतेकांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येतो.
थर्मामीटरने 25 -26 सेल्सियस तापमान पार केलं की मृत्यू दर वाढू लागतो.
मात्र, काही पुराव्यांवरुन तरी असं दिसतं की, मृत्यूचं प्रमाण हे कडक उन्हाळयाऐवजी वसंत ऋतू किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस जास्त असतं.
उन्हाळा जसजसा वाढत जातो तसतसं आपण आपल्या दैनंदिन वर्तनात बदल करू लागतो. आणि उष्णतेला सामोरे जाण्याची आपल्याला सवय होते.
मागील उष्णतेच्या लाटेचा पुरावा बघता उष्णतेच्या लाटेच्या पहिल्या 24 तासांत मृतांची संख्या वाढते.
7) शरीराचं तापमान संतुलित कसं ठेवता येईल?
शरीराला आवश्यक एवढं पुरेसे पाणी किंवा दूध घ्या. चहा-कॉफी पण चालू शकते. अति मद्यपान करू नका. यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो.
जर बाहेरचं वातावरण जास्त गरम असेल, तर खिडक्या बंद करून त्यावर पडदे ओढणे केव्हाही चांगले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








