College admission: महाविद्यालये सुरू करण्याबाबत उदय सामंत काय म्हणाले?

College admission: महाविद्यालय सुरू करण्याबाबत उदय सामंत काय म्हणाले?

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, उदय सामंत
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार असे संकेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी 4 ऑगस्ट रोजी दिले होते.

परंतु आता तातडीने महाविद्यालये सुरू होणार नाहीत असं उदय सामंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.

उदय सामंत यांनी 4 ऑगस्ट रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेत आठवड्याभरात महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ अशी घोषणा केली होती.

यासंदर्भात बीबीसी मराठीने उदय सामंत यांची मुलाखत घेतली.

1. 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार असं शालेय शिक्षण विभागाने सांगितलं आहे. महाविद्यालय कधी सुरू होणार?

उदय सामंत: आठवड्याभरात आम्ही यादिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. शिक्षण संचालकांनाही निर्देश दिले आहेत. परंतु कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. टास्क फोर्सने घाई करु नका असं सांगितलं आहे.

2. महाविद्यालय सुरू करण्याची नेमकी तारीख काय?

उदय सामंत: टास्क फोर्सच्या बैठकीत पावलं जपून टाका असं सांगितलं आहे. महाविद्यालये सुरू करत असताना एकावेळी 35-40 लाख विद्यार्थी बाहेर पडणार, एकत्र येणार. त्यामुळे आम्ही SOP तयार करणार त्यानंतर आपातकालीन समिती ज्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करणार. त्यानंतर निर्णय घेणार.

3. विद्यार्थ्यांचे लसीकरण कसे करणार?

उदय सामंत: लसीकरणाबाबत आदित्य ठाकरेंशी चर्चा झाली आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे लसीकरण करू शकलो तर कॉलेज लवकर सुरू करता येईल अशी आमची भूमिका आहे. पण त्यासाठी लस उपलब्ध आहे का ते सुद्धा महत्त्वाचं आहे.

4. शाळा सुरू करण्याची तारीख जाहीर झाली मग महाविद्यालयांची का नाही? किंवा महाविद्यालये सुरू करत नाही मग शाळा का करत आहेत? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन विभागात समन्वय नाही का?

उदय सामंत: शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाचा आहे. शाळेचा अभ्यासक्रम, पॅटर्न वेगळं. कॉलेजमध्ये मुलांना क्लास, ग्रथालंय, प्रयोगशाळा सगळीकडे जावं लागतं. विद्यार्थी संख्या सुद्धा जास्त असते. त्यामुळे आम्ही संपूर्ण तयारी करुनच निर्णय घेणार आहोत. शाळा आणि कॉलेज दोन्हींचा पॅटर्न वेगळा आहे.

5. पदवीचे प्रवेश कसे होणार?

उदय सामंत: पदवी प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा होणार नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी होईल. याचा निर्णय महाविद्यालय स्वतंत्र घेऊ शकतात. प्रवेशाच्या जागा वाढवण्यात येतील.

शाळा सुरू होत असल्या तरी महाविद्यालय सुरू होण्यास अजून वेळ असल्याचं स्पष्ट झालं आहे.

विद्यार्थिनी

फोटो स्रोत, Getty Images

यासाठी राज्यातील विविध विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालक आढावा घेतील.

यासंदर्भातील अहवाल आपात्कालीन समितीकडे सादर केला जाईल. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच महाविद्यालये सुरू होणार आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)