CBSE च्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, कधी आहे परीक्षा?

विद्यार्थिनी

फोटो स्रोत, Getty Images

सीबीएसईनं 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

दहावीची परीक्षा 4 मे रोजी सुरू होणार असून 7 जूनपर्यंत चालणार आहे. बारावीची बोर्डाची परीक्षाही 4 मे रोजीच सुरू होईल. मात्र बारावीची परीक्षा 11 जूनपर्यंत सुरू राहील.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज (2 फेब्रुवारी) दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

परीक्षेच्या तारखांसोबतच यावर्षी पेपरची वेळही नमूद करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा ही सकाळी 10.30 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1.30 वाजता संपेल.

बारावीची बोर्डाची परीक्षा दोन सत्रात होईल. सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत पहिलं सत्र असेल तर दुसरं सत्र दुपारी 2.30 ते 5.30 पर्यंत असेल.

परीक्षेचं वेळापत्रक सीबीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना 10 ते 10.15 च्या दरम्यान उत्तरपत्रिका दिली जाईल. पुढचा पंधरा मिनिटांचा वेळ हा प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येईल.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा याची काळजी आम्ही वेळापत्रक तयार करताना घेतली आहे, असं शिक्षण मंत्र्यांनी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करताना म्हटलं आहे.

कोरोना संसर्गामुळे यावर्षी 10वी आणि 12वीचे विद्यार्थी काही महिने शाळेत जाऊ शकले नव्हते. काही राज्यांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांनाही कोव्हिड-19 संदर्भात आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)