तांडव वेबसीरिजकडून स्पष्टीकरणः भावना दुखावल्या असल्यास...

फोटो स्रोत, Tandav Poster/Amazon Prime
अॅमेझॉन प्राइमची नवीन वेब सीरीज तांडववरून सुरू झालेला वाद अजूनच चिघळला आहे.
तांडव वेबसीरिजमधून लोकांच्या भावना दुखावल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर तांडवकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. ही वेबसिरिज पूर्णतः काल्पनिक असून जर कोणत्याही घटनांशी साधर्म्य असेल तर तो योगायोग समजावा असे तांडवतर्फे सांगण्यात आले.
उत्तर प्रदेशमध्ये या सीरीजचे निर्माते, दिग्दर्शक तसंच अॅमेझॉन प्राइमविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. लखनौमधील हजरतगंज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील अधिकारी अपर्णा पुरोहित, 'तांडव'चे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते हिमांशू किशन मेहरा, लेखक गौरव सोळंकी आणि इतरांच्या विरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलभमणि त्रिपाठी यांनी ट्विटरवर याची कॉपी शेअर केली आणि लिहिलं की, "लोकांच्या भावनांसोबत असा खेळ सहन केला जाणार नाही. घाणेरड्या वेबसीरीजच्या आडून द्वेष पसरविणाऱ्या तांडवच्या पूर्ण टीम विरोधात योगीजी यांच्या उत्तर प्रदेशमध्ये गंभीर कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे...आता अटकेची तयारी ठेवा."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
महाराष्ट्रातही भाजप आमदार राम कदम तसंच ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनीही 'तांडव' या वेब सीरीजवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती.
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सैफ अली खान यांच्या घरासमोरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
'तांडव' वेबसीरिजवरून वाद का?
अॅमेझॉन प्राइम या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हिमांशू किशन मेहरा यांची निर्मिती असलेली आणि अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेली तांडव ही नऊ भागांची वेबसीरीज नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.
त्यात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, झिशान अयूब, तिग्मांशू धुलिया, संध्या मृदूल, दीनो मोरिया, हितेन तेजवानी, अनुप सोनी यांच्या भूमिका आहेत.
या वेब सीरिजच्या पहिल्या भागात झिशान अयूब शंकर बनलेले दाखवले आहेत. त्यांना त्यांचा भक्त म्हणतो की, "तुम्ही आता डोळे उघडा भगवान रामांचे फॉलोअर्स सध्या वाढताना दिसत आहेत. त्यावर झिशान यांचं पात्र उपहासाने काही वाक्यं बोलतं."
या दृश्यावरच आक्षेप घेण्यात आले आहेत. हा हिंदू देव-देवतांचा अपमान असल्याचं आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
भाजप आमदार राम कदम यांनी यासंदर्भात ट्वीट करून म्हटलं, "चित्रपट किंवा वेबसीरीजच्या माध्यमातून हिंदू देवतांचा अपमान करणं हा ट्रेंड का बनत आहे? याचं अलिकडंच उदाहरण म्हणजे तांडव ही वेबसीरीज."
सैफ अली खान पुन्हा एकदा अशा सीरिजचा भाग बनले आहेत, "ज्यामध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. अली अब्बास जफर यांनी हे दृश्य हटवलं पाहिजे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
राम कदम यांनी याच संदर्भात अजून एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी हे दृश्य साकारणाऱ्या झिशान अयूब यांनी माफी मागावी, असंही म्हटलं आहे.
तसंच या वेब सीरीजमधील अनेक दृश्यं ही समाजात फूट पाडणारी, महिलांचा अपमान करणणारी आहेत, असाही आक्षेप घेण्यात आला आहे.
अजून कोणी घेतला आहे आक्षेप?
ईशान्य मुंबईचे आमदार मनोज कोटक यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हिंदू देवतांचा अपमान करण्याचे प्रयत्न वारंवार केले जातात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
तांडव वेब सीरीजमध्ये हिंदू देवी आणि देवतांचा उपहास करण्यात आल्याची तक्रार वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तिंनी केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी एक कायदेशीर नोटीस पाठवून अमेझॉन इंडियानं ही वेब सीरीज प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात यावी, असं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
दूरदर्शननंही ट्वीट करून म्हटलं आहे की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या वेब सीरीजच्या संदर्भात अमेझॉन प्राइमला स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
शांतता, सौहार्द आणि परस्पर बंधुभावाचं वातावरण खराब होऊ नये यासाठी या वेब सीरीजमधील आक्षेपार्ह दृश्यं हटविण्यात यावं, असं ट्वीट समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)