School Reopen : महाराष्ट्रातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार - वर्षा गायकवाड

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली आहे.

शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.

वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "27 जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. मुलांची RT-PCR टेस्ट बंधनकारक आहे. पालकांची लेखी परवानगी असेल तर मुलांना शाळेत प्रवेश देता येईल. इतर पूर्वतयारी करायची आहे. यानंतर प्रशासन शाळा सुरू करू शकते."

असं असलं तरी मुंबईतील शाळा पुढील आदेशापर्यंत सुरु होणार नाहीत, अशी माहिती मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रक जारी करत दिली आहे.

मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही अन्य देशांमध्ये कोरोनाची असलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेतील सर्व खासगी आणि सरकारी शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असं मुंबई महापालिकेने जाहीर केलं आहे.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)