उद्धव ठाकरे: अवकाळी पावसासाठी सरकारनं जाहीर केलेले 10 हजार कोटी रुपये रक्कम तुटपुंजी

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, TWITTER

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची ते पाहणी करत आहेत.

अवकाळी पावसाची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याला 25 ते 50 हजार रुपये प्रती हेक्टर देणं गरजेचं आहे. सरकारनं दिलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे, असं उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत म्हटलं.

पत्रकारांच्या सत्तास्थापनेच्या प्रश्नावर मात्र मौन बाळगलं. ते म्हणाले, "सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यावरच बोलू."

त्यांनी म्हटलं, "हातातोंडाशी आलेलं पीक नासलं आहे. पुढच्या 15 दिवसांत पुढच्या मोसमाची तयारी करणं गरजेचं आहे आणि ही तयारी झाली नाही तर पुढचा हंगाम हातातून जाईल. शेतकऱ्याला साधारणत: 25 ते 50 हजार रुपये प्रति हेक्टर देणं गरजेचं आहे. सरकारनं दिलेली 10 हजार कोटींची मदत त्रोटक आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कोणतीही अट न घालता तात्काळ 25 हजार रुपये प्रति हेक्टर सरकारनं द्यावेत."

"राज्यात ओला दुष्काळ आहे. शासकीय यंत्रणा शेतकऱ्याच्या दारात कशी जाईल, हे शिवसेना बघेल. बँकांनी शेतकऱ्यांशी माणसासारखं वागावं. त्यांच्या अडचणी समजून घ्याावात. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी जशी उभी आहे, तसंच सरकारनंही उभं राहावं. केंद्र सरकारनं राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे," असंही त्यांनी पुढे म्हटलं.

दरम्यान, "अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करत आहोत. पीक विम्याची रक्कमही मिळेल असा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (2 ऑक्टोबर) स्पष्ट केलं आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले, याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी, याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात आला नाही. मात्र येत्या 2 ते 3 दिवसात नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)