कृपाशंकर सिंह : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, ज्यांना भाजपनं दिली यूपीतून उमेदवारी

कृपाशंकर सिंह

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर प्रदेशमधील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून कृपाशंकर सिंह यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. कृपशंकर सिंह हे मुंबईतील भाजपचे नेते आहेत. महाराष्ट्र भाजपचं उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे.

यापूर्वी ते काँग्रेसचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

कृपाशंकर सिंह यांना मुंबईतील काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखलं जात होतं. ते 2004 च्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते.

कृपाशंकरसिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप झाले होते. तसंच कोकणातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणीसुद्धा त्यांच्यावर आरोप झाले होते.

कृपाशंकर सिंह कोण आहेत?

कृपाशंकर सिंह 1971ला उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून मुंबईला कामाच्या शोधात आले होते. मुंबईच्य एका झोपडपट्टीत राहत सुरूवातीला त्यांनी एका औषध बनवणाऱ्या कंपनीत काम केलं. या कामाच्या मोबदल्यात त्यांना दिवसाला आठ रुपये मिळायचे. पण हा पैसा कुटुंबाची गुजराण होण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे रिकाम्या वेळेत ते रस्त्यावर कांदे-बटाटे विकायचे.

कृपाशंकर सिंह

फोटो स्रोत, Facebook

इंदिरा गांधींकडून प्रेरणा घेऊन राजकारणात

कृपाशंकर सिंह यांचे वडील जौनपूरमधले स्वातंत्र्यसैनिक होते. मुंबईत आल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांकरिता आवाज उठवला. स्थानिक पातळीवर ते त्यांच्यासाठी काम करायला लागले.

काही दिवसांनंतर कृपाशंकर सिंह यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी राजकारणात प्रवेश केल्याचं म्हटलं जातं.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा आरोप

कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता.

आरोपानुसार, 1999 मध्ये आमदार बनल्यानंतर त्यांचं उत्पन्न प्रति महिना 45 हजार झालं. पण 1999 ते 2014 पर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती खरेदी केली. सुमारे 320 कोटींची संपत्ती त्यांच्या तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने आहे. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबईच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फेब्रुवारी 2018 मध्ये विशेष कोर्टानं मात्र त्यांचं हे प्रकरण पुढे चालवू नये असं म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)