नरेंद्र मोदी : मी घटनेला नमन केलं आणि हा विचार माझ्या मनात आला....

फोटो स्रोत, NArendra modi/facebook
सतराव्या लोकसभेत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली आहे. संसद भवनात सुरू असलेल्या एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रस्तावाला एनडीएच्या घटक पक्षांच्या अध्यक्षांनी अनुमोदन दिलं. तत्पूर्वी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मोदींच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडला. त्याला राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिलं.
या बैठकीत नरेंद्र मोदींनी भाषणात भारतीयांचे आभार मानले.
मोदींच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे -
1. मी तुमच्यातलाच एक आहे. आपण सगळ्यांना एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे.
2. 2014 पासून 2019पर्यंत देशानं जबाबदारी उचलली आहे. सव्वा कोटी लोकांनी गॅसची सबसिडी सोडली आहे. यामुळेच देशात प्रो-इन्कबन्सीची लाट तयार झाली. एकमेकांवरील विश्वासामुळे ही लाट तयार झाली आहे.
3. जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं आहे. यामुळे मान अभिमानानं उंचावते. मी आज घटनेला नमन केलं, तेव्हा लोकप्रतिनिधीनं भेदभाव करायचा नसतो, असा विचार मनात आला.
4. लोकप्रतिनिधींना सब का साथ, सब का विकास वर भर द्यावा. हा आपला, हा परका, हे धोरण बाळगू नये.

फोटो स्रोत, Ani
5. 2014मध्ये जितकी मतं भाजपला मिळाली त्याहून अधिक मतं 2019मध्ये मिळाली. 17 राज्यांतील मतदारांनी भाजपला 50 टक्क्यांहून अधिक मतं दिली. लाट वगैरे हे शब्द यापुढे फिके वाटतात.
6. मी निवडणुकीत केलेले दौरे प्रचारासाठी नाही तर लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी केले.
7. 2019ची निवडणुकीत माझ्यासाठी एक तीर्थयात्रा होती. 'जनता जनार्दन ईश्वर का रूप होता है,' हे मी या निवडणुकीत अनुभवलंय.
8. या निवडणुकीत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीत मतदान केलं. पुढच्या वेळेस महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा अधिक असेल.

फोटो स्रोत, Reuters
9. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला संसदेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
10. एनडीएकडे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे एनर्जी आणि दुसरी म्हणजे सिनर्जी. या दोन गोष्टी आमचं सामर्थ्य आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








