शीख दंगल वक्तव्यावरून वाद: सॅम पित्रोदांना माफी मागायला लावून राहुल गांधींनी काय संदेश दिला?

फोटो स्रोत, The India Today Group/getty
1984च्या शीख दंगलीबद्दल काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पित्रोदांना खडे बोल सुनावले आहेत. पित्रोदांनी माफी मागावी, असं राहुल म्हणाले.
ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सॅम पित्रोदा म्हणाले होते, "1984चं आता काय घेऊन बसलात? तुम्ही पाच वर्षांत काय केलं? त्याबद्दल बोला ना. 1984मध्ये जे झालं ते झालं तुम्ही काय केलं?"
त्यांच्या या वक्तव्यानंतर शीख समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर सॅम पित्रोदांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझं हिंदी खराब आहे आणि मला जे म्हणायचं होतं, त्याचा अर्थ पूर्णपणे चुकीचा लावण्यात आला. मला म्हणायचं होतं जे झालं ते चुकीचं झालं, आता आपण पुढं जाऊ," असं ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच काँग्रेसने एका निवेदनात पक्षाला पित्रोदांच्या या वक्तव्यापासून लांब केलं आहे. सॅम पित्रोदांचं मत हे पक्षाचं मत नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
"1984च्या शीख दंगलीतील पीडितांना न्याय मिळावा, ही काँग्रेसची भूमिका आहे. या दंगलीतील गुन्हेगारांना योग्य शिक्षा व्हावी असं देखील काँग्रेसला वाटतं. पक्षाच्या या भूमिकेव्यतिरिक्त जो कोणी आपलं मत मांडेल ते त्या व्यक्तीचं वैयक्तिक मत समजलं जाईल," असं काँग्रेसने म्हटलं आहे.
1984च्या दंगलीतील तसंच 2002च्या गुजरात दंगलीतील पीडितांना न्याय मिळावा, असं आम्हाला वाटतं हे काँग्रेसनं म्हटलं आहे.
सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी पित्रोदांवर टीका केली आहे. पित्रोदांच्या या वक्तव्यातून काँग्रेसची विचारधारा स्पष्ट होते, असं मोदी म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
"1984 मध्ये जेव्हा दंगली झाल्या त्यानंतर राजीव गांधी म्हणाले होते 'जेव्हा एखादं मोठं झाड पडतं तेव्हा जमीन हादरते'. त्यानंतर आयोग बनले, समित्या बनल्या पण कुणाला शिक्षा झाली नाही.
"इतकंच नाही तर त्यांनी कमलनाथ यांना पंजाबचं प्रभारी बनवलं, पण पंजाबमध्ये त्यांच्या नावाला विरोध झाला. आता ते (मध्य प्रदेशचे) मुख्यमंत्री झाले आहे. पित्रोदा यांचं वक्तव्य हे काँग्रेसच्या विचारधारेचं प्रतिबिंब आहे," असं मोदी म्हणाले.
राहुल यांनी खडसावलं
दरम्यान, यावरून उठलेल्या वादंगानंतर बोलताना पित्रोदा म्हणाले की आपलं अपयश झाकण्यासाठी भाजपने माझं वक्तव्य फिरवलं.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे की सॅम पित्रोदाचं वक्तव्य हे अनुचित आहे. त्यांनी माफी मागायला हवी.
सॅम पित्रोदा यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. त्यांनी माफी मागायला हवी. याबाबत मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणार आहे असं राहुल म्हणाले.
'माफी शब्दाचा उच्चार महत्त्वाचा'
बीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर यांनी केलेलं विश्लेषण:
1984 साली झालेल्या हत्याकांड प्रकरणी आजपर्यंत गांधी कुटुंबीयांनी कधी इतक्या पटकन प्रतिक्रिया दिली नव्हती. पण राहुलनी ताबडतोब प्रतिक्रिया देऊन गांधी कुटुंबीयांच्या निकटवर्तीय असलेल्या सॅम पित्रोदांना माफी मागायला सांगितली.
आता पंजाबमध्ये मतदान होणार आहे आणि सॅम पित्रोदांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचं नुकसान होऊ शकलं असतं. पण मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळे ते नुकसान कमी होईल, असं मला वाटतं.
राहुलनी असंही म्हटलं की सोनिया गांधींनी यापूर्वीच माफी मागितली आहे. पण वास्तवात सोनिया गांधींनी 1998 साली चंदिगडमध्ये खेद व्यक्त केला होता. राहुलनी माफी हा शब्द उच्चारून शिखांचे गांधी कुटुंबासोबतचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
पंजाबमध्ये शीख नेत्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 84 नंतर विजय मिळवला आहे, पण गांधी घराण्याविषयी आजही अनेक शिखांच्या मनात अढी आहे. पण आता माफी हा शब्द वापरून राहुल त्या सर्वांना साद घालत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)