बालाकोट हल्ल्यात 200 जणांचा मृत्यू झाल्याचं पाकिस्तानच्या कर्नलनं मान्य केलं? - फॅक्ट चेक

व्हायरल व्हीडिओतल्या 20व्या सेकंदाला कर्नल फैझल या मुलासोबत बोलताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, SM Viral Post

फोटो कॅप्शन, व्हायरल व्हीडिओतल्या 20व्या सेकंदाला कर्नल फैझल या मुलासोबत बोलताना दिसत आहेत.
    • Author, प्रशांत चहल
    • Role, बीबीसी फॅक्ट चेक टीम, दिल्ली

बालाकोट हल्ल्यात 200 जणांचा मृत्यू झाल्याच्या एका व्हायरल व्हीडिओचा आधार घेत केंद्रीय मंत्र्यानं ट्वीट केलं आहे. यात किती तथ्य आहे?

भारतातल्या अनेक न्यूज चॅनल्सनी हा व्हीडिओ या दाव्यासहित दाखवला आहे की, बालाकोट हल्ल्यात 200 जण मृत्यूमुखी पडल्याची बाब पाकिस्तानच्या लष्करातील अधिकाऱ्यानं स्वीकारली आहे.

टीव्हीवर यायच्या अगोदर हा व्हीडिओ आम्हाला सोशल मीडियावर शेयर होताना दिसला होता. भारतीय वायुसेनेच्या बालाकोट हल्ल्याचा पुरावा, अशा कॅप्शनसहित फेसबुकवरील काही ग्रुप्समध्ये या व्हीडिओला शेयर करण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी एक व्हीडिओ ट्वीट करत म्हटलं आहे की, भारतीय सैन्याच्या शौर्यावर पाकिस्तान रडत आहे. या बाबीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे आणि देशातील गद्दार लष्कराला अपमानित करत आहेत, लष्कराकडून पुरावे मागत आहे.

बालाकोट हल्ला

फोटो स्रोत, TWITTER

काही यू-ट्यूब चॅनल्सशिवाय 'मोदीनामा' आणि 'अच्छे दिन'सारख्या फेसबुक पेजवर हा व्हीडिओ शेयर करण्यात आला आहे. तसंच या व्हीडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

टीव्ही चॅनल्सवर दाखवण्यात आल्यानंतर हा व्हीडिओ वेगानं फिरत आहे आणि बालाकोट हल्ल्याचे पुरावे या नावासहित व्हाट्सअपवर शेयर केला जात आहे. बीबीसीच्या वाचकांनी हा व्हीडिओ आमच्याकडे पाठवला आणि याची सत्यता पडताळण्याचं सांगितलं आहे.

बालाकोट हल्ल्यात 200 लोक मारले गेले, या बाबीचा स्वीकार पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यानं या व्हीडिओत कुठेही केलेला नाही, असं या व्हीडिओची पडताळणी करताना आमच्या लक्षात आलं.

पीडित कुटुंबासोबत पाकिस्तानच्या लष्कराचे कर्नल फैझल कुरैशी.

फोटो स्रोत, Nasur Ullah/Facebook

फोटो कॅप्शन, पीडित कुटुंबासोबत पाकिस्तानच्या लष्कराचे कर्नल फैझल कुरैशी.

'200 नाही, एकाच व्यक्तीचा मृत्यू'

पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार रहीमुल्ला युसूफझाई यांच्याशी आम्ही या व्हीडिओसंदर्भात बोललो तेव्हा त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

पहिली बाब म्हणजे, "या व्हीडिओत पाकिस्तानी अधिकाऱ्याजवळ बसलेली वृद्ध माणसं पश्तू भाषेत बोलत आहे. तर खैबर पख्तूनख्वाच्या मानसेरा-बालाकोट भागात हिंडको भाषा बोलली जाते."

ते पुढं सांगतात की, "दुसरी गोष्ट म्हणजे जे पाकिस्तानी अधिकारी लोकांशी बोलत आहेत ते 200 लोक दगावल्याची नाही, तर 200पैंकी कुणीतरी एक जण दगावल्याचं सांगत आहेत. व्हीडिओला बारकाईनं ऐकल्यास ही बाब समोर येते."

व्हीडिओमध्ये ते म्हणत आहेत की, "आम्ही याच्यासाठी आलोय की जे लोक सरकारच्या बरोबरीनं लढा देत आहेत, तोच खरा जिहाद आहे. आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या नशीबात नसते. तुम्हाला माहितीच आहे की काल 200 जण वरती डोंगरावर गेले होते. त्यांच्या नशिबी शहीद होणं लिहिलं होतं. आमच्या नशिबात ते लिहिलेलं नव्हतं. आम्ही रोज डोंगरावर चढतो, येतो आणि जातो. पण अल्लाहची खास नजर असणाऱ्या लोकांच्याच नशिबी शहीद होणं असतं."

पण बालाकोट हल्ल्यात 200 जणांचा मृत्यू झाला आणि पाकिस्तानी अधिकारी या बाबीचा स्वीकार करत आहे, असं सांगत भारतात हा व्हीडिओ शेयर करण्यात येत आहे.

गावातल्या लोकांना भेटताना पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी ब्रिगेडियर हलीम

फोटो स्रोत, Farman Ullah Khan/Facebook

फोटो कॅप्शन, गावातल्या लोकांना भेटताना पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी ब्रिगेडियर हलीम

'व्हीडिओ बालाकोटचा नाही'

या व्हीडिओला फ्रेम-बाय-फ्रेम सर्च केल्यानंतर जी सर्वांत जुनी फेसबुक पोस्ट मिळते, ती 1 मार्च 2019ची आहे.

उर्दूमध्ये लिहिलेल्या या फेसबुक पोस्टच्या मते, "हा व्हीडिओ कथितरित्या पाकिस्तानी लष्करातील एहसानुल्लाह नावाच्या अधिकाऱ्याच्या अंत्ययात्रेचा आहे. या व्यक्तीचं गाव खैबर पख्तूनख्वा भागात आहे."

बीबीसीनं पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांशी या व्हीडिओबाबत विचारणा केली.

त्यांच्या मते, "हा व्हीडिओ खैबर पख्तुनख्वाच्या पश्चिमेकडील दीर भागातील आहे. हा भाग बालाकोटपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. पाकिस्तानी लष्करातील अधिकारी पीडित कुटुंबीयांना भेटायला गेले होते."

फेसबुकच्या माध्यमातून या घटनेशी संबंधित दुसऱ्या एका व्हीडिओत दिसणाऱ्या इक्बाल शाहीन, फरमानुल्लाह खान आणि खिश्ता रहमान दुरानी यांची ओळख केली.

या तिघांच्या 2 मार्चच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या बाबीची पुष्टी होते की, ब्रिगेडियर हलीम आणि कर्नल फैझल कुरेशी पीडित कुटुंबीयांना भेटायला त्यांच्या गावात गेले होते. या तिघांनी फेसबुकवर स्वत:ला दीर भागातील सांगितलं आहे.

भारतात या घटनेशी संबंधित जो व्हीडिओ शेयर होत आहे त्यामध्ये कर्नल फैझल कुरेशी यांचा आवाज ऐकू येतो.

बालाकोट हल्ला

फोटो स्रोत, SM Viral Post

व्हीडिओविषयी पाकिस्तानातही संभ्रम

भारतात हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर काही पाकिस्तानी मीडिया वेबसाईट्सनं हा व्हीडिओ फेक असल्याचं म्हटलं आहे. बालाकोट हल्ल्यातील मृतांची संख्या खरी ठरवण्यासाठी भारतीय मीडियानं खोटा व्हीडिओ बनवला आहे, असं या वेबसाईट्सवर लिहिलं आहे.

पण, या वेबसाईट्सनं या व्हीडिओविषयी जी सूचना दिली आहे, ती तथ्यात्मकदृष्ट्या चुकीची आहे.

'डेली पाकिस्तान डॉट कॉम'नं लिहिलं आहे की, हा व्हीडिओ LOCवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या फायरिंगमध्ये नायक खुर्रम यांच्यासोबत मृत्युमुखी पडलेल्या हवालदार अब्दुल राब यांच्या अंतिम संस्कारापूर्वीचा आहे.

पण पाकिस्तानचा सरकारी रेडियो 'रेडियो पाकिस्तान'च्या अधिकृत पोस्टनुसार, हे दोन्ही सैनिक पाकिस्तानच्या पंजाबमधील डेरा गाझी खान या ठिकाणाशी संबंधित आहेत.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)