ज्येष्ठ अभिनेते राकेश रोशन यांची कॅन्सरशी झुंज

फोटो स्रोत, Instagram/Hrithik Roshan
बॉलिवूडमधील आणखी एक सेलिब्रिटी कॅन्सरशी झुंज देत आहेत. माजी अभिनेता आणि निर्माते राकेश रोशन यांना कॅन्सर झाला आहे. त्यांच्यावर लवकरच सर्जरी होणार आहे.
अभिनेता ऋतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्याच पोस्टमध्ये त्यांनी राकेश रोशन यांना कॅन्सर झाल्याचा उल्लेख केला आहे.
काही आठवड्यांपूर्वीच त्यांना कॅन्सर झाल्याचं कळलं असून सध्या सुरुवातीच्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ऋतिक रोशन लिहितात, "आज सकाळी मी बाबांना एक फोटो द्या असं सांगितलं. मला माहिती होतं की सर्जरीच्या दिवशीही ते जिमला जातीलच. काही आठवड्यांआधी त्यांना स्क्वेमस सेल कार्सिनोम नावाचा घशाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. मात्र या रोगाशी ते दोन हात करण्यासाठी तयार आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 1
एक कुटुंब म्हणून आम्ही भाग्यवान आहोत आणि असा कुटुंबप्रमुख मिळाला म्हणून आम्ही धन्य आहोत."
गेल्या काही काळात आणखी काही सेलिब्रिटी लोकांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
सोनालीची कॅन्सरशी झुंज
याआधी सोनाली बेंद्रेंनाही कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. उपचारासाठी त्या न्यूयॉर्कलाही गेल्या होत्या. आता त्या भारतात परतल्या आहेत.
त्यांना हायग्रेड मेटास्टॅटिस कॅन्सर झाला होता. त्यांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून आपल्या आजाराची माहिती दिली होती.
सोनाली बेंद्रे लिहितात, "मला नुकतंच हाय ग्रेड मेटास्टॅटिस कॅन्सर झाल्याचं कळलं आहे. मला कधीही असं वाटलं नव्हतं. वारंवार होणाऱ्या वेदनांना कंटाळून मी जेव्हा तपासण्या केल्या तेव्हा आश्चर्यकारक अहवाल समोर आले."
सोनाली यांनी जवळजवळ सहा महिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले. डिसेंबर महिन्यात त्या मुंबईला परतल्या.

फोटो स्रोत, Sonali Bendre/facebook
सोनाली बरी होतेय असं सांगतानाच त्यांचे पती गोल्डी बहल यांनी "आता ती कायमची परतली आहे. सध्या उपचार थांबवले आहेत. मात्र आजार पुन्हा बळावू शकतो, त्यामुळे उपचार सुरू राहतील." असं म्हटलंय.
भारतात परतण्याआधी सोनाली यांनी इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्टही लिहिली होती.
ऋषी कपूरही उपचारासाठी अमेरिकेत
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूरही आजारी असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांनी 29 सप्टेंबर 2018 ला एक ट्विट केलं होतं. त्यात अमेरिकेत उपचाराला जाण्याबाबत त्यांनी उल्लेख केला होता.
त्यानंतर ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. त्यात ते बदललेले आणि आजारी दिसत होते. तेव्हापासून ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याच्या चर्चांना वेग आला.
ते अमेरिकेत उपचारासाठी गेले आहेत असंही सोशल मीडियावर समजलं. त्यानंतर ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2
"ऋषी कपूर यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. लोकांना जे बोलायचं आहे ते बोलू द्यावं. त्यांच्या फोटोवरून कळतं की त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे." असं रणधीर यांनी म्हटलंय
ताहिरा कश्यपला स्तनांचा कॅन्सर
आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपलाही स्तनांचा कॅन्सर झाला आहे. आयुष्मान खुराणाने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. ताहिरा यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी केमोथेरेपीनंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्टही लिहिली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)