काँग्रेसच्या बदनामीसाठी 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'ची निर्मिती?

फोटो स्रोत, PENMOVIES/TRAILERGRAB/BBC
मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील चित्रपट ' द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ' या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाल्यापासून ट्वीटरवर टॉप ट्रेंडमध्ये आहे.
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचं कथानक संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. तर चित्रपटात बारु यांची भूमिका अक्षय खन्ना साकारत आहे.
11 जानेवारीला 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांच्या आवाजाची जी हुबेहूब नक्कल केली आहे, त्यावरुन प्रेक्षकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. पण त्याचवेळी रीलीजच्या तारखेवरुनही लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत या चित्रपटातील काही संवाद चर्चेचा विषय होऊ शकतात.
ट्रेलरमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे काही डायलॉग बघा..
- मला तर डॉक्टरसाहेब पितामह भीष्म यांच्यासारखे वाटतात. त्यांच्यात कुठलीच वाईट गोष्ट नाहीए. पण ते सध्या फॅमिली ड्रामाचे पीडित वाटतात
- महाभारतात तर दोन कुटुंबं होती, भारतात तर फक्त एकच आहे
- 100 कोटी लोकसंख्या असलेला देश काही मूठभर लोक चालवतात, तेच लोक देशाची गोष्ट लिहितात
- अणुकराराची लढाई ही आमच्यासाठी पानिपतच्या लढाईपेक्षाही मोठी होती
- अख्ख्या दिल्ली दरबारात एकच चर्चा होती, की डॉक्टरसाहेबांना कधी खुर्चीवरुन बाजूला करतात आणि कधी काँग्रेस पार्टी राहुल गांधींचा राज्याभिषेक करते
- मला कुठलंही क्रेडिट नको आहे. मला कामाशी देणंघेणं आहे. माझ्यासाठी देश सर्वोपरी आहे
- 'मला पदाचा राजीनामा देण्याची इच्छा आहे' एकामागोमाग एक घोटाळ्यांची मालिका सुरु आहे. पण या सगळ्या परिस्थितीत राहुल गांधी कसं काम सांभाळू शकणार आहेत
संजय बारु कोण होते?
2004 ते 2008 या काळात संजय बारु पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते.
2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यालयानं या पुस्तकावर टीका केली होती.

फोटो स्रोत, AFP
'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' या पुस्तकात संजय बारु यांनी दावा केला आहे की "कुठल्याही सरकारमध्ये सत्तेची दोन केंद्रं असू शकत नाहीत. यामुळे गडबड होऊ शकते. पण मला हे मान्य करावं लागेल की पक्षाचे अध्यक्ष सत्तेचं केंद्र आहे. आणि सरकार पक्षाला उत्तरदायित्व आहे."
त्यावेळी पंतप्रधान कार्यालयानं हे असे दावे म्हणजे आपल्या पदाचा दुरुपयोग असून आर्थिक फायदा करुन घेण्यासाठीचा प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं होतं.
पुस्तकात संजय बारु यांनी कुठले दावे केले आहेत?
- 2009 च्या विजयानंतरच मनमोहन सिंग यांची हतबलता लक्षात येत होती. आपल्याच कार्यालयात कुणाला नियुक्त करायचं हेसुद्धा त्यांच्या हातात नव्हतं. त्यांनी आपले अधिकार खूप आधीच दुसऱ्यांच्या हाती सोपवले होते.
- सोनिया गांधी यांची राष्ट्रीय सल्लागार परिषद एखाद्या सुपर कॅबिनेटसारखी काम करत होती. सगळ्या सामाजिक सुधारणांच्या कार्यक्रमांचं श्रेय त्यांनाच दिलं जात होतं.

फोटो स्रोत, AFP
- मनमोहन सिंग यांची इतकी अवहेलना सुरु होती, की एकदा अमेरिका दौऱ्यावरुन आल्यानंतर परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जींनी साधी भेट घेऊन पंतप्रधानांना दौऱ्याची माहिती देणंही गरजेचं समजलं नाही
- 2004 मध्ये सोनिया गांधींनी सत्तेपासून दूर राहण्याचा घेतलेला निर्णय अंतर्रात्म्याचा आवाज वगैरे नव्हता. तर तो एक नियोजित राजकीय डाव होता.
लोकांच्या प्रतिक्रिया
अंकित कुमार यांच्या मते, "मनमोहन सिंग यांच्यावरची फिल्म येत्या लोकसभा निवडणुकांवर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. या चित्रपटावरुन मोठा राजकीय ड्रामा होण्याची शक्यता आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
भावना अरोडा म्हणतात की "मनमोहन सिंग अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर होते, आणि या अॅक्सिडेंटनंतरच त्यांचा आवाजही गेला."
यूट्यूबवर अंकित प्रभाकर यांनी लिहिलंय की "या चित्रपटातून काँग्रेसला खलनायक म्हणून रंगवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे कदाचित काँग्रेस 2019 च्या निवडणुकीत पराभूत होईल. मग पुन्हा अब की बार मोदी सरकार"
ट्रेलरचे स्क्रीनशॉट्स घेऊन काही लोक मीम बनवून शेअर करतायत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
संजू शर्मा म्हणतात की "या ट्रेलरच्या माध्यमातून काँग्रेसला चुकीच्या पद्धतीनं रंगवलं जातंय."
इकराम पटेल यांच्या मते "अगदी निवडणुकीआधी हा चित्रपट रीलीज होत आहे, पण मतदारांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही."
अनुपम खेर यांच्या आवाजाची स्तुती करताना वेंकटेश यांनी लिहिलंय की "आवाज कमाल आहे, असं वाटतंय की खरंच डॉ.मनमोहन सिंग यांनीच डबिंग केलंय."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
वैभव सिंग यांना वाटतंय की "साम-दाम-दंड-भेद प्रत्येक नीती या निवडणुकीत आजमावली जाईल"
प्रथित सेन यांच्या मते मात्र "डॉ.मनमोहन सिंग यांना ज्या पद्धतीनं दाखवलं जातंय, ते अगदीच चूक आहे"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)