जोरदार थंडी, तिखटजाळाची मिसळ आणि नवा विक्रम

फोटो स्रोत, BBC/Swati Patil Rajgolkar
- Author, स्वाती पाटील-राजगोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून
खाद्यसंस्कृती जगतात कोल्हापूर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. निमित्त होतं मिसळ खाण्याच्या उपक्रमाचं.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil Rajgolkar
'Continental of Hotel Management' च्या वतीनं शेफ दिग्विजय भोसले यांनी बनवलेल्या कोल्हापूरी मिसळवर अनेकांनी ताव मारला.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil Rajgolkar
सकाळच्या गुलाबी थंडीत, कोवळ्या उन्हात आबालवृद्ध मिसळ खाण्यासाठी रंकाळा तलावाकाठी असलेल्या पदपथ उद्यानात आवर्जून आले होते.
या चविष्ट उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ World Record मध्ये करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil Rajgolkar
कोल्हापूर म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर येतो तो तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी मटण. त्यातही मिसळ म्हटलं तर तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil Rajgolkar
खवय्यांची ही आवडीची कोल्हापुरी मिसळ world record मध्ये गेलीय. कारण म्हणजे 2500 हून अधिक लोकांनी मिसळ खाण्याचा हा उपक्रम...
पर्यावरण पूरक ताटामध्ये मिसळचा चिवडा, कांदा, कोथिंबीर, लिंबू, लालभडक कट, आणि ब्रेड slice असा भन्नाट बेत रविवारी पूर्ण झाला. मिसळ खाण्याच्या या उपक्रमात कोल्हापूरकर हौसेने सहभागी झाले आणि त्यांनी झणझणीत मिसळीवर ताव मारला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








