'भाजपच्या अपयशाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची'

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी

"विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे," असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मुसंडी मारत भाजपला धूळ चारली आहे. या निकालांचा उहापोह पळशीकर यांनी बीबीसी न्यूज मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसंच काँग्रेसला मिळालेल्या यशामागे नेमकी काय कारणं दडली आहेत याचंही त्यांनी मुद्देसूद विश्लेषण केलं आहे.

डॉ. पळशीकर यांनी निवडणूक निकालांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. त्यांची ही मुलाखत खाली दिलेल्या बीबीसी विश्व बुलेटीनच्या युट्यूब लिंकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तसंच, त्यांची संपूर्ण मुलाखत बीबीसी न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलवरही पाहायला मिळेल.

बीबीसी विश्व बुलेटीन पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)