प्रियंका आणि निक जोनस यांना लोक म्हणत आहेत 'नांदा सौख्य भरे'

प्रियंका चोप्रा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, टीम बीबीसी हिंदी
    • Role, नवी दिल्ली

प्रियंका चोप्राची दिल की 'धडकन' कोण हे आता स्पष्ट झालं आहे. तिचा 'इश्कचा सलाम' कोणाला आहे हे एका ट्वीटमुळे समोर आलं आहे. 'दिल धडकने दो' असं म्हणणाऱ्या प्रियंकाच्या 'राशीला' नक्की कोण आहे हे आता जगासमोर आहे.

बॉलिवुड असो की हॉलिवुड प्रियंका चोप्रा सतत चर्चेत असते. मग ती क्वांटिको सीरिज असेल, बेवॉच असेल इंग्लिश मनोरंजन क्षेत्रात तिचा दबदबा काही कमी नाही.

सध्या प्रियंकाच्या रिलेशनशिपवरून चर्चा, गॉसिप याला उधाण आलं आहे आणि याला कारण ठरलंय एक ट्वीट. अली अब्बास जाफर या ट्वीटमुळे.

प्रियंका चोप्रा, मनोरंजन इंडस्ट्री

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, प्रियंका चोप्रासंदर्भातील ट्वीट

प्रियंका आता 'भरत' चित्रपटाचा भाग असणार नाही. याचं कारण एकदम खास आहे. तिने आम्हाला काही दिवसांपूर्वीच याविषयी सांगितलं. हे कारण कळल्यावर आम्हाला आनंद झाला. प्रियकांला आयुष्यातील नव्या इनिंग्जसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! असं दिग्दर्शक अली अब्बास झफर यांनी ट्वीट केलं आहे.

या ट्वीटच्या आधीपासूनच प्रियंकाच्या रिलेशनशिपची चर्चा होती. या व्यक्तीचं नाव आहे निक जोनस. प्रियंका चोप्राने एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. त्यात समुद्राकडे पाहत दोन व्यक्ती उभे होते. तो गोव्याचा फोटो होता. त्यात तिने लिहिलं होतं, 'माझा आवडता पुरुष'.

या फोटोत एक जोनस आहे आणि त्यांचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आहे. काही दिवसांआधी जोनस यांनी इन्स्टाग्राम यांनी एक व्हीडिओ शेअर केला होता,त्यात प्रियंका नाचताना दिसतेय. त्यात लिहिलं होतं, 'तो'.

निक जोन्स

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या साखरपुड्या आधीच्या पार्टीत प्रियंका तिथे आली. तेव्हा निक तिच्यासोबत होताच. प्रियंकानं सगळ्यांशी त्याची ओळखही करून दिली.

सोशल मीडियावरच्या फोटोजचा आणि व्हीडिओ नीट बघितले तर निक आणि प्रियंका यांचं प्रेम प्रकरण रंगलेलं असल्याचं लक्षात येतं. दोघांनीही या गोष्टीला नकार दिलेला नाही. उलट इन्स्टाग्राम वर टाकलेल्या फोटोजबरोबर टाकलेल्या कॅप्शनमध्ये त्याला दुजोरा दिला जात आहे.

निकनं मुंबईत येऊन प्रियंकाची आई मधू यांना भेटला, असं पीपल मॅगझिननं म्हटलं होतं. प्रियंका आणि निक यांच्या अफेअरची चर्चा मे महिन्यात सुरू झाली होती. तेव्हापासून अनेकदा ते एकत्र दिसले होते.

पण निक जोनस आहे कोण? कुठला राहणारा आहे? आणि प्रियंकाशी जवळीकीची सुरुवात कधीपासून झाली? निकोलस जेरी जोनस अमेरिकन गायक, लेखक, अभिनेता आणि रेकॉर्ड प्रोड्युसर आहे. तो सात वर्षांचा होता तेव्हापासून त्याने अभिनय करायला सुरुवात केली.

निक यांचा जन्म अमेरिकेतील टेक्सास स्टेटमध्ये डल्लास येथे पॉल केविन जोनास सिनिअर यांच्या पोटी झाला. जो आणि केविन यांनी मिळून निक यांनी बँड बनवला, त्याचं नाव होतं- द जोनस ब्रदर्स

भावाबरोबर बँड

2006 साली त्यांचा पहिला अल्बम Its about time आला तेव्हा निकचं वय फक्त 13 होतं. या बँडला डिस्ने चॅनलवर मोठं यश मिळालं.

2014 साली हा बँड वेगळा झाला, त्यानंतर निक यांनी सोलो अल्बम रिलीज केला. 2017मध्ये त्यांचा I remember I told you या अल्बममध्ये एनी मेरी होती.

निक जोन्स

फोटो स्रोत, Instagram

त्यानंतर ते काही चित्रपटात दिसला. 2015 मध्ये Careful what you wish for चित्रपटात त्यांना एक भूमिका मिळाली आणि 2019 मध्ये अपेक्षित असलेल्या साय फाय फिल्म Chaos walking मध्ये डेवी प्रेटिंस ज्युनिअरची भूमिका निभावतील.

निकची संपत्ती 1.8 कोटी डॉलर इतकी आहे. त्यात जोनास ब्रदर्स बँड आणि त्यांच्या टीव्ही करिअरचा मोठा वाटा आहे.

जेव्हा निक 13 वर्षांचा होता तेव्हा त्याला टाईप 1 डायबेटिस झाल्याचं कळलं. त्यानंतर त्यांनी 'चेंज फॉर चिल्ड्रन फाऊंडेशन' तयार केलं. या आजाराबाबत जागृती निर्माण करण्याचं काम हे फाऊंडेशन करत.

प्रियंका चोप्रा

फोटो स्रोत, Getty Images

निकच्या आयुष्यात याआधीही अनेक नावं जोडली गेली आहेत. 2006-07 मध्ये त्यांची गर्लफ्रेंड माईली सायरस होती. या अफेअरचा खुलासा माईली यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात केला होता. 2009 मध्ये ते पुन्हा जवळ आले पण नंतर त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)