सोशल :'आता ग्रामपंचायत निवडणुकीला मोदी आले तरी नवल वाटणार नाही'

फोटो स्रोत, Getty Images
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विरारमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
"शिवसेना शिवाजी महाराजांचं नाव घेते, पण अफझलखानाचं काम करते," असं आदित्यनाथ या सभेत म्हणाले. उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या असलेल्या पालघर लोकसभा निवडणुकीसाठी 28 मेला मतदान आहे.
या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना विचारलं होतं की, महाराष्ट्रातल्या पोटनिवडणुकांसाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मैदानात उतरवलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया -
विनित मयेकर लिहितात, "हास्यास्पद आहे हे. याचा अर्थ एकच होतो, मोदींच्या जीवावर निवडून आले असल्यामुळे, काहीही कामं न केल्यामुळे त्यांना या पोटनिवडणुकीसाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं."
"योगीजींना तिथे (प्रचारात) आणण्यापेक्षा त्यांना मंत्रालयात आणून त्यांच्याकडून राज्य सक्षमपणे कसं चालवावे ह्याचे धडे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांना द्यावेत," असंही ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Facebook
"भाजप इतर पक्षांसारखी पारंपरिक पद्धतीने किंवा वरवर निवडणूक लढवत नाही हे आतापर्यंत सिद्ध झालंय. प्रत्येक निवडणुकीत ते आपलं तन-मन-धन झोकून देतात. मग अशा सर्वस्व पणाला लावून लढणाऱ्या पक्षाने जर आपली सगळी ताकद वापरली तर ते योग्यच आहे," असं मत योगेश घावनलकर यांनी व्यक्त केलंय.

फोटो स्रोत, Facebook
तर योगेश चौधरी यांना हे "खरंच खूप चुकीचं" वाटतं. ते म्हणतात, "पालघर मध्ये भैय्या लोक जास्त आहेत काय? मुळात मतदानाचा अधिकार महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी लोकांनाच असला पाहिजे."

फोटो स्रोत, Facebook
संतोष जाधव विचारतात, "केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना युपीचा मुख्यमंत्री विधानपरिषदेचे निवडणुकीकरिता आणावा लागतो ही गोष्ट भाजपसाठी चिंतेची आणि लाजिरवाणी आहे. इथल्या मुख्यमंत्र्यावर भरवसा नाही काय?"

फोटो स्रोत, Facebook
"प्रत्येक निवडणूक ही सणासारखी असते. हा सण साजरा करण्याची इच्छा असणारी कुठलीही व्यक्ती लोकांमध्ये जाऊन प्रचार करू शकते. विकासाच्या मुद्दयावर चर्चा घडणं आवश्यक आहे," असं प्रमोद सोनुने म्हणतात.

फोटो स्रोत, Facebook
"जो स्वतः गोरखपूर मतदार संघात पराभूत झाला, तो पालघरमध्ये काय दिवे लावणार," असं विचारलं आहे दिपक मगदूम यांनी.

फोटो स्रोत, Facebook
हर्षल देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे की, "उत्तर भारतीयांची संख्या जास्त असल्यामुळे भाजपानं योगींना मैदानात आणलं आहे, हे ठीक. पण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा बाकीचे नेते सक्षम नाहीयेत का?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
रणजीत राजणे लिहितात की, "काही दिवसांनी ग्रामपंचायत निवडणुकीला मोदी आणि योगी आले तरी नवल वाटणार नाही."

फोटो स्रोत, Facebook
"गैर काय आहे यात, प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीची लढाई असते," असं मत व्यक्त केलं आहे सुधीर कुलकर्णी यांनी.

फोटो स्रोत, Facebook
"योगींना बाळासाहेब ठाकरेंच्या कार्याविषयी माहीत नसेल म्हणून ते शिवसेनेबद्दल असं बोलले असावेत," असं कैलास गटोळेंना वाटतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)