सलमान खान : जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली

फोटो स्रोत, STR/AFP/Getty Images
काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे.
शुक्रवारी राजस्थान हायकोर्टाच्या वेबसाइटवर टाकण्यात आलेल्या ट्रांसफर ऑर्डरनुसार जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रविंद्र कुमार जोशी यांची बदली सिरोही या ठिकाणी झाली आहे.
त्यांच्या जागी चंद्र शेखर शर्मा यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शुक्रवारी सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली नव्हती. कनिष्ठ स्तरावरील न्यायालयाचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळं कारवाई शनिवारी होईल असं म्हटलं गेलं होतं, अशी माहिती जोधपूरमध्ये उपस्थित असलेले पत्रकार नारायण बारेठ यांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
या आदेशानंतर या प्रकरणावर शनिवारी सुनावणी करायची की नाही हे न्या. रवींद्र कुमार जोशी यांच्यावर अवलंबून आहे असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
राजस्थान हाय कोर्टाने आपल्या वेबसाइटवर टाकलेल्या ट्रांसफर ऑर्डरनुसार एकून 87 न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त




