जेव्हा रजनीकांत मिसकॉलवर बोलतात तेव्हा...

रजनीकांत

फोटो स्रोत, Facebook

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नव्हे तर अवघ्या भारतीय मनांवर अधिराज्य गाजवणारे मूळचे मराठी अभिनेते शिवाजी गायकवाड म्हणजेच सुप्रसिद्ध 'रजनीकांत'. त्यांच्या नावानं फिरणाऱ्या विनोदाचे खंड तयार होतील.

रजीनकांत यांच्या खास अभिनय शैलीमुळे त्यांचे अनेक प्रकारचे विनोद, जीफ, मीम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या विनोदांमुळे अनेकांना हास्याचा खळखळाट केल्यावाचून राहवत नाही.

रजनीकांत यांना घड्याळ लागत नाही. कारण...

1. रजनीकांत यांना घड्याळाची गरजच लागत नाही. कारण, त्यांची वेळ तो स्वतःच ठरवतात.

2. रजनीकांत 100 या आपत्कालिन नंबरवर जेव्हा फोन करतात, तेव्हा त्यांना फक्त 'सगळं ठीक आहेत ना?' एवढंच विचारायचं असंत.

3. रजनीकांत यांच्या कॅलेंडरमध्ये 1 एप्रिल ही तारीखच नाही. कारण, रजनीकांत यांना कोणी 'एप्रिल फूल' बनवू शकत नाही.

4. रजनीकांत जेव्हा एअरपोर्टवर एमिग्रेशन डेस्कवर जातात, तेव्हा एमिग्रेशनचे अधिकारीच त्यांना पासपोर्ट दाखवतात.

5. रजनीकांत हे एकमेव व्यक्ती आहेत जे 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतात.

रजनीकांत

फोटो स्रोत, Facebook

6. रजनीकांत हे एकमेव अभिनेते आहेत ज्यांना अभिनयाचं नोबेल पारितोषिक मिळालं आहे.

फोनचा शोध लावला तेव्हा...

7. अॅलेक्झांडर बेल यांनी ज्या क्षणी फोनचा शोध लावला तेव्हा त्यांना रजनीकांत यांच्याकडून 3 मिसकॉल आले होते.

8. रजनीकांत टकीला शॉट क्रिकेटमध्येही खेळू शकतात.

9. रजनीकांत यांनी मॅकडॉनल्डमध्ये इडलीची ऑर्डर दिली आणि त्यांना तात्काळ इडली मिळाली देखील.

10. एखादी गोष्ट कॉपी करण्याआधी रजनीकांत यांनी ती पेस्टही केलेली असते.

11. रजनीकांत हे जगातले एकमेव असे व्यक्ती आहेत जे आपल्या गर्लफ्रेंडला तिची चूक मान्य करायला लावू शकतात.

12. फेसबुकवर रजनीकांत जेव्हा लॉग-इन करतात; तेव्हा फेसबुक आपलं स्टेटस अपडेट करतं.

रजनीकांत

फोटो स्रोत, Facebook

13. रजनीकांत यांनी एकदा घोड्याला टाच मारली आणि त्या घोड्याचं जिराफातच रुपांतर झालं.

...ते पायानं पृथ्वी सरकवतात

14. रजनीकांत खरंतर चालत नाहीत. ते एकाच जागी राहतात आणि पृथ्वी त्यांच्या पायानं पुढे सरकवतात.

15. रजनीकांत यांनीच 'डेड सी' (मृत समुद्र) मारून टाकला आहे.

16. रजनीकांत हेच फक्त एखाद्या मिसकॉलवर बोलू शकतात.

17. बाईक न्यूट्रल गिअरवर असूनही रजनीकांत रेसिंग स्पर्धा जिंकले.

18. उत्क्रांतीचा सिद्धान्त अशी संकल्पनाच अस्तित्वात नाही. पृथ्वीवर जगणाऱ्या जिवांची एक यादी करून त्यांना जगण्याची परवानगी रजनीकांत यांनीच दिली आहे.

रजनीकांत

फोटो स्रोत, Facebook

19. एकदा पुण्यावरून मुंबईला मेल पाठवण्यात आला. तो मेल रजनीकांत यांनी लोणावळ्याला थांबवला.

20. रजनीकांत यांच्या घरी मादाम तुसाँ यांचा मेणाचा पुतळा आहे.

शेवटचा आणि सगळ्यांत गाजलेला विनोद म्हणजे;

21. एकदा एका पत्रकारानं रजनीकांतला त्याच्याबद्दल येणाऱ्या जोकबद्दल विचारलं. तर, रजनीकांत हसून म्हणाले, "तुम्हाला ते जोक आहेत असं वाटतं?"

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)