गुजरात निवडणूक : जिग्नेश मेवाणी रिंगणात आल्यानं गणितं बदलणार का?

फोटो स्रोत, Getty Images
गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे गुजरातच्या निवडणुकीला आणखीच रंगत आली आहे.
बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम विधानसभा मतदार संघातून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. मेवाणी यांनी ट्विटरवर त्यांचा निर्णय जाहीर केला.
या मतदार संघाचे विद्यमान आमदार मणीभाई वाघेला काँग्रसचे आहेत. या मतदारसंघातून काँग्रसने या अजून उमदेवार जाहीर केलेला नाही.
तर भाजपने विजयभाई चक्रवर्ती यांना उमदेवारी दिली आहे.
ऊना इथे गोरक्षकांनी दलितांना केलेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर मेवाणी यांनी आंदोलन उभं केलं होतं.
राष्ट्रीय दलित अधिकार मंच या संघटेनच्या माध्यमातून उभारलेल्या या आंदोलनामुळं त्यांचं नाव देशभर झालं होतं. वडगाम मतदार संघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
जिग्नेश यांच्या या निर्णयाचं राजकीय विश्लेषक स्वागत करत आहेत. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दलित चळवळीतील कार्यकर्ते मार्टिन मॅक्वान म्हणाले, "जिग्नेश त्यांचं तत्त्व आणि त्यानुसार कामासाठी कटिबद्ध आहेत, यात कसलीही शंका नाही. अर्थात जिग्नेश यांचा हा निर्णय दलित समाजातील काहींना आवडणार नाही."
"जिग्नेश यांच्या या निर्णयाचा परिणाम दलित आंदोलनावरही होतील. दलित आंदोलन आणि निवडणूक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत", असं ते म्हणाले.
दलित आंदोलन ही दीर्घकाळ चालणारी चळवळ आहे. मेवाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, ही बाब महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं.
बनासकांठा जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागा आहेत. वडगाम मतदारसंघात 2007ला भाजपचे फकीरभाई वाघेला विजयी झाले. त्यानंतर ते समाज कल्याण खात्याचे मंत्री होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
2012ला काँग्रेसचे उमेदवार मणीभाई वाघेला यांनी फकीरभाई वाघेला यांचा पराभव केला होता.
समाजशास्त्रज्ञ गौरांग जानी म्हणाले, "दलित समाजातील नेतृत्व पुढे येत असेल तर स्वागत केलं पाहिजे. वडगाम मतदार संघ या आरक्षित असल्यानं त्याचा लाभ मेवाणी यांना होईल."
"अनुसूचित जातींसाठी राखीव जागांवर राजकीय पक्ष ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देताना दिसतात. त्यादृष्टीनंही मेवाणी यांची उमेदवारी महत्त्वाची आहे. दलित समाजाला अशा नेतृत्वाची गरज आहे", असं जानी म्हणाले.

फोटो स्रोत, TWITTER.COM/JIGNESHMEVANI80
वडगाम तालुका आणि पालणपूर तालुक्यातील काही गावांचा हा मतदारसंघ बनला आहे. या मतदार संघातील मतदारांची संख्या 2,57,687 इतकी आहे. यात पुरुष मतदारांची संख्या 1,31,856 तर महिला मतदारांची संख्या 1,25,830 इतकी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








