सतीश आळेकर मुलाखत : व्यक्तीस्वातंत्र्य, कलाकारांची भूमिका आणि देशाचं सामाजिक आरोग्य या प्रश्नांची थेट उत्तरं
सतीश आळेकर मुलाखत : व्यक्तीस्वातंत्र्य, कलाकारांची भूमिका आणि देशाचं सामाजिक आरोग्य या प्रश्नांची थेट उत्तरं
ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि रंगकर्मी सतीश आळेकर हे आधुनिक मराठी रंगभूमीतील एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी पारंपरिक नाटकांच्या चौकटी मोडत सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रश्नांना वेगळ्या आणि प्रयोगशील शैलीत मांडलं.
सतीश आळेकर हे पुण्यातील थिएटर अकॅडमी, एफटीआयआयशी संबंधित राहिले असून अनेक वर्षे त्यांनी अभिनय व नाट्यलेखनाचं शिक्षण दिलं आहे.
महानिर्वाण, मिकी अँड मेमरी, बेगम बर्वे, द डेथ ऑफ अ मॅन यांसारखी त्यांची नाटकं विशेष गाजली.
‘महाराष्ट्राची गोष्ट’ या विशेष मुलाखतींच्या मालिकेत सतीश आळेकर यांनी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळेंशी बोलताना व्यक्तीस्वातंत्र्य, कलाकारांची भूमिका आणि देशाचं सामाजिक स्वास्थ या प्रश्नांना थेट उत्तरं दिली आहेत. पाहा ही विशेष मुलाखत
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






