राजस्थानच्या वाळवंटाला थिरकवणाऱ्या कालबेलिया नृत्यांगणा

व्हीडिओ कॅप्शन, राजस्थानच्या वाळवंटाला थिरकवणाऱ्या कालबेलिया नृत्यांगना
राजस्थानच्या वाळवंटाला थिरकवणाऱ्या कालबेलिया नृत्यांगणा

अरवलीच्या डोंगरांमध्ये आणि वाळवंटात वसलेलं हे शहर हिंदू धर्मियांसाठी एक महत्वाचं स्थळ आहे.

दरवर्षी, दिवाळी झाली की, पुष्करचं रुप बदलून असं होतं. इथं सुरू होतो पुष्कर मेळा. खरंतर या मेळ्याची सुरुवात धार्मिक कारणांनी झाली, मग पुढे हाच मेळा पशु-व्यापारासाठी ओळखला जाऊ लागला. प्रामुख्यानं उंट पाळणारे लोक इथे उंटांची विक्री करण्यासाठी येऊ लागले.

आता गेल्या काही वर्षांमध्ये हा पुष्करचा मेळा त्यापलीकडे गेलाय आणि एक सांस्कृतिक आकर्षणाचं केंद्र बनलाय.

आता जगभरातले पर्यटक हा पुष्कर मेळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी येतात. आणि हो फोटोग्राफर्सना या जागेचं जरा विशेष आकर्षण आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)