लठ्ठपणा कमी करण्यासाठीच्या इंजेक्शनचा तुटवडा, WHO नं काय इशारा दिला?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हेगोवी हे एक विशेष इंजेक्शन असतं. ते लठ्ठपणाच्या समस्येवरील औषध आहे. म्हणजे वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, डिजिटल हेल्थ एडिटर

व्हेगोवी हे एक विशेष इंजेक्शन असतं. ते लठ्ठपणाच्या समस्येवरील औषध आहे. म्हणजे वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) या इंजेक्शनसंदर्भात इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या या इंजेक्शनवरील पहिल्या मार्गदर्शक सूचनेत हा इशारा देण्यात आला आहे.

हे इंजेक्शन महत्त्वाचं असलं तरीदेखील, व्हेगोवीसारख्या लठ्ठपणावरील इंजेक्शनचा फायदा घेऊ शकणाऱ्या 10 पैकी एका व्यक्तीलाच ते मिळू शकतं, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

जगभरात सध्या एक अब्जहून अधिक लोक लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत आहेत. त्यामुळे जीएलपी-1 औषधांचा वापर अधिक व्यापक स्वरूपात आणि न्याय्य पद्धतीनं केला जाण्याची मागणी होते आहे.

अंदाजानुसार, लठ्ठपणाच्या समस्येवर पावलं न उचलल्यास 2030 पर्यंत दोन अब्जाहून अधिक लोक लठ्ठ झालेले असतील.

इंजेक्शन सर्वांसाठी उपलब्ध नसल्यानं WHO ला चिंता

जास्त किंमत, मर्यादित उत्पादन क्षमता आणि पुरवठा साखळीतील अडचणी हे या इंजेक्शनच्या अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत.

हे इंजेक्शन लोकांना त्यांच्या वजनात लक्षणीय बदल करण्यास मदत करू शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं या इंजेक्शनचा समावेश आधीच 'अत्यावश्यक' औषधांच्या यादीत (मधुमेह असलेल्या लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या रुग्णांसाठी) केला आहे.

म्हणजेच देशांना हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक (डायरेक्टर जनरल) टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले, आमच्या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये हे सांगण्यात आलं आहे की लठ्ठपणा हा एक दीर्घकाळ राहणारा आणि वाढत जाणारा आजार (क्रोनिक आजार) आहे. त्याची व्यापक स्वरूपात आणि आयुष्यभर काळजी घेतली जाऊ शकते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जगभरात सध्या एक अब्जहून अधिक लोक लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"फक्त औषधोपचारानं हे आरोग्यविषयक जागतिक संकट दूर होणार नसलं, तरीदेखील जीएलपी-1 थेरेपींमुळे लाखो लोकांना लठ्ठपणावर मात करण्यास आणि त्याच्याशी निगडीत अपाय कमी करण्यास मदत होऊ शकते."

जागतिक आरोग्य संघटनेचं म्हटलं आहे की, ही औषधं, ज्यांना कधीकधी स्किनी जॅब्स असंही म्हटलं जातं, समाज लठ्ठपणाकडे कसा पाहतो, त्यामध्ये हळूहळू बदल घडवून आणण्यातील एक नवीन अध्याय आहेत.

लठ्ठपणा ही एक 'जीवनशैलीमुळे निर्माण झालेली स्थिती' आहे इथपासून ते तो एक गुंतागुतींचा, टाळता येणारा आणि उपचार करण्यायोग्य प्रदीर्घ काळ राहणारा आहे असा हा दृष्टीकोनातील बदल आहे.

जागतिक आरोग्य संघटना म्हणते की ही औषधं दीर्घकाळासाठी म्हणजे सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ घेतली जाऊ शकतात.

मात्र ती प्रिस्क्राईब करताना त्यासोबत आहार आणि व्यायामाविषयीचा सल्ला दिला पाहिजे. म्हणजे लोकांना त्यांचं वजन आटोक्यात ठेवता येईल.

टेड्रोस म्हणाले, "जगातील फारच थोड्या लोकांना हे औषध मिळू शकतं, असं डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे. हे औषध सर्वांना समान आणि न्याय्य प्रमाणात मिळालं पाहिजे, ही आमची सर्वात मोठी चिंता आहे."

लठ्ठपणावरील इंजेक्शनचा (स्किनी जॅब्स) तुटवडा

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, अगदी सध्याच्या सर्वोत्तम अंदाजित परिस्थितीत देखील, जवळपास 10 कोटी लोकांना मिळू शकेल इतकंच जीएलपी-1 थेरेपींचं उत्पादन होऊ शकतं.

या औषधाची आवश्यकता असलेल्या लोकांपैकी 10 टक्क्यांहून कमी लोकांनाच ते मिळू शकतं.

जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्वं देशांना आणि कंपन्यांना स्वैच्छिक परवाना (व्हॉलंटरी लायसन्सिंग) देण्याच्या धोरणाद्वारे या औषधाचा पुरवठा वाढण्याचं आवाहन करते.

स्वैच्छिक परवाना म्हणजे एखादी औषधनिर्मिती कंपन्यांनी या औषधाचं पेटंट घेतलेलं असतं.

अशा पेटंट केलेल्या औषधाच्या परवडणाऱ्या बिगर ब्रँड आवृत्त्या बनवण्याची परवानगी औषध निर्मिती कंपनी इतरांना देते.

2026 मध्ये सेमाग्लुटाइडवरील पेटंटची मुदत अनेक देशांमध्ये संपणार आहे. सेमाग्लुटाइड हे नोवो नॉर्डिक्स व्हेगोवीमधील मुख्य घटक आहे.

याचा अर्थ इतर औषधनिर्मिती कंपन्यांना लवकरच भारत, कॅनडा, चीन, ब्राझील आणि तुर्कीयेसारख्या देशांमध्ये या औषधांचं उत्पादन करता येईल आणि ती स्वस्तात विकता येतील.

जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, देशांनी चांगल्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लठ्ठपणा रोखण्यासाठी निकोप वातावरण तयार केलं पाहिजे.

लठ्ठपणावरचं औषध कसं काम करतं?

जीएलपी-1 औषधं ही शरीरात तयार होणाऱ्या एखाद्या नैसर्गिक हार्मोनसारखी कृती करतात.

ही हार्मोन पचनक्रियेचा वेग कमी करतात, भूक कमी करतात आणि अधिक काळ पोट भरल्याची भावना निर्माण करतात. जेणेकरून लोक कमी खातात.

युकेमध्ये, ही इंजेक्शन फक्त प्रिस्क्रिपशद्वारे दिली जातात. म्हणजेच ती ज्या व्यक्तीला वैद्यकीयदृष्ट्या त्याची आवश्यकता आहे, अशा व्यक्तीला फक्त डॉक्टरांकडूनच लिहून दिली जाऊ शकतात.

काही इंजेक्शन नॅशनल हेल्थ सर्व्हिसवर (एनएचएस) उपलब्ध आहेत. मात्र यातील बहुतांश खासगीरित्याच विकली जातात.

या औषधांचा काळाबाजार होतो. त्यामुळे सुरक्षितता म्हणून लोकांनी ही औषधं कोणत्याही प्रकारचं नियमन नसलेल्या ब्युटी सलून किंवा सोशल मीडियावरील विक्रेत्यांकडून खरेदी करणं टाळलं पाहिजे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दर आठवड्याची इंजेक्शन सुरू झाल्यानंतर काही आठवड्यात लोकांचं वजन कमी होण्यास सुरूवात होते.

दर आठवड्याची इंजेक्शन सुरू झाल्यानंतर काही आठवड्यात लोकांचं वजन कमी होण्यास सुरूवात होते.

संशोधनातून दिसून आलं आहे की हे औषध घेणं थांबवल्यानंतर वर्षभराच्या आत बहुतेकांचं वजन पूर्ववत होऊ शकतं. कारण खाण्याची त्यांची सामान्य इच्छा पूर्ववत होते.

वजन अधिक असल्यामुळे किंवा लठ्ठपणामुळे मधुमेह, ह्रदयविकार, स्ट्रोक आणि विशिष्ट कर्करोग यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो.

लठ्ठपणाचा परिणाम प्रत्येक देशातील लोकांवर होतो आहे. 2024 मध्ये जगभरात 37 लाख लोकांच्या मृत्यूशी लठ्ठपणाचा संबंध होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)