समृद्धी महामार्गावर 3 वर्षांत 4 हजार 762 अपघात आणि 314 जणांचा मृत्यू का झाला? ग्राऊंड रिपोर्ट
समृद्धी महामार्गावर 3 वर्षांत 4 हजार 762 अपघात आणि 314 जणांचा मृत्यू का झाला? ग्राऊंड रिपोर्ट
‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होऊन 3 वर्षं पूर्ण होताहेत. हा महामार्ग लोकांसाठी खुला करण्यात आला तेव्हापासून या महामार्गावर 4762 अपघात झाले आणि या अपघातांमध्ये 314 जणांचा मृत्यू झालाय.
समृद्धी महामार्गावरील अपघात आणि अपघातांमधील मृतांची संख्या वाढलीय. समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे, असा दावा सरकारने केला होता.
पण खरंच तसं झालं का? या महामार्गावरील नियमितपणे प्रवास करणाऱ्यांचं काय म्हणणं आहे? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
व्हीडिओ एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






