मुंबईत लोकलमधून उतरताना वाद, प्लॅटफॉर्मवरच प्राध्यापकाची हत्या

मुंबईत लोकलमधून उतरताना वाद, प्लॅटफॉर्मवरच प्राध्यापकाची हत्या

अंधेरी स्थानकावरील हत्येच्या घटनेनं मुंबईतील रेल्वेमधील गर्दीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरत असताना झालेल्या वादातून एका 33 वर्षीय प्राध्यापकावर हल्ला केला.

ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात प्राध्यापक आलोककुमार सिंग यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर हल्लेखोर फरार झाला होता.

बोरिवली रेल्वे पोलिसांनी संपूर्ण रात्रभर अथक परिश्रम करून आरोपी ओमकार शिंदे याला मालाडमधून पकडण्यात आलं आहे.