ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करणाऱ्या संगमनेरच्या तरुणीला भेटलात का?
ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करणाऱ्या संगमनेरच्या तरुणीला भेटलात का?
सुप्रिया नवले अहमदनगर जिल्ह्यातल्या मालदाड गावात राहतात. सध्या त्या ड्रोन पायलट म्हणून काम करत आहेत. BSC Agri पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुण्यात ड्रोन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलं. केंद्र सरकारच्या सवलत योजनेतून त्यांना ड्रोन आणि इतर साहित्य मिळालं.
सुप्रिया यांच्याकडील ड्रोन पिकांवर किडनाशक, बुरशीनाशक व खतांच्या फवारणीसाठी वापरलं जातं. ड्रोनने पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकरी त्यांना बोलवतात, त्यामुळे त्यांना मोबदलाही चांगला मिळतो. ड्रोनच्या वापराने पिकांची उत्पादकता वाढते असा दावा करण्यात येतो, ग्रामीण भागात ड्रोन वापरण्यात काही अडचणी आणि आव्हानही आहेत.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – अरविंद पारेकर






