बांगलादेशात हिंसाचारादरम्यान हिंदूंची परिस्थिती काय आहे?
बांगलादेशात हिंसाचारादरम्यान हिंदूंची परिस्थिती काय आहे?
गेल्या आठवड्यात बांगलादेशात शेख हसीना यांनी सत्ता सोडल्यानंतर देशभरातून हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्या, विशेषत: हिंदूंना लक्ष्य केलं गेलं, इतर अल्पसंख्याक समुदायांनाही हिंसाचाराला सामोरं जावं लागलं.
सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, बांगलादेशातील 52 जिल्ह्यांमध्ये असे 200 हून अधिक हल्ले झाले आहेत, ज्यात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचं जीवित आणि मालमत्तेचं नुकसान झाले आहे.
भारताच्या पंतप्रधानांपासून ते संयुक्त राष्ट्रांपर्यंत सर्वांनीच या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित आणि देबलीन रॉय यांनी बांगलादेशला जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.






