नीरज चोप्राला मागे टाकणाऱ्या अर्शद नदीमचा प्रवास कसा होता?

व्हीडिओ कॅप्शन, नीरज चोप्राला मागे टाकणाऱ्या अर्शद नदीमचा प्रवास कसा होता?
नीरज चोप्राला मागे टाकणाऱ्या अर्शद नदीमचा प्रवास कसा होता?

पॅरिसच्या स्टेड द फ्रान्स या स्टेडियमवर 8 ऑगस्टला एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यात भालाफेक स्पर्धेत रस्सीखेच सुरू होती.

भारत आणि पाकिस्तानातील प्रेक्षक नीरज चोप्रा आणि अर्षद नदीम या दोघांनाही चिअर करत होते. अखेर नदीमने नवा विक्रम करत सुवर्ण पदक मिळवलं.

नीरजचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि पाकिस्तानचा खेळाडू असूनही अर्शदनं भारतीयांचं मन कसं जिंकलं? त्याची आजवरची वाटचाल कशी होती? जाणून घेऊया