देवाच्या नावानं राखलेली ही जंगलं का आहेत महत्त्वाची? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
देवाच्या नावानं राखलेली ही जंगलं का आहेत महत्त्वाची? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
कित्येक शतकांपासून जगाच्या पाठीवर देवराया उभ्या आहेत. देवराई म्हणजे देवाच्या नावानं राखलेलं पवित्र जंगल.
माणसाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीत आजही टिकून राहिलेला वारसा. देवरायांची परंपरा कधी सुरु झाली याचं निश्चित उतर नाही. पण पशुपालन आणि शेती करणा-या माणसाची जंगलांशी जोडलेली लोकदैवतं निर्माण झाली.
त्यांच्या कथा निर्माण झाल्या आणि कथांनी परंपरा जागी ठेवली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






