नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि हिंसाचार का झाला?
नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि हिंसाचार का झाला?
17 मार्च रोजी नागपुरात दोन गटातील वादातून तणाव निर्माण झाला. वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीच्याही घटना घडल्या.
पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून शांतता राखण्याचं आवाहन सर्वसामान्यांना केलं आहे.
परिस्थिती आटोक्यात आल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी सांगितलं. काही ठिकाणी जाळपोळ झाली तसंच दगडफेक देखील झाली.
नागपुरातून भाग्यश्री राऊत यांचा रिपोर्ट
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






