'मुलीच्या आजारामुळे सासरचे म्हणाले तिला मारून टाक...', एका आईच्या संघर्षाची कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, 'मुलीच्या आजारामुळे सासरचे म्हणाले तिला मारून टाक...', एका आईच्या संघर्षाची कहाणी
'मुलीच्या आजारामुळे सासरचे म्हणाले तिला मारून टाक...', एका आईच्या संघर्षाची कहाणी

लामिया 14 वर्षांची आहे, पण तिचा मेंदू दीड वर्षाच्या बाळाइतकाच आहे. पण तिची आई भार्गवी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभीय.

आपल्या लड्डूला ती राजकुमारीसारखं वागवते. लामियाला ग्लोबल डेव्हलपमेंटल डिले नावाचा आजार आहे.

ती 14 वर्षांची आहे पण तिचा मेंदू दीड वर्षांच्या बाळाइतकाच विकसित झालाय. तिला हायड्रोसेफॅलस झालाय, म्हणजे तिच्या डोक्यात पाणी झालंय. तिच्या दोन्ही किडनी एकाच आकाराच्या नाहीयत.