इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनवत हिंदू-मुस्लीम भाईचारा जपणारे मोहम्मदभाई

व्हीडिओ कॅप्शन, इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनवत, हिंदू-मुस्लीम भाईचारा जपणारे मोहम्मदभाई
इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनवत हिंदू-मुस्लीम भाईचारा जपणारे मोहम्मदभाई

40 वर्षीय मोहम्मद कोस्सर शेख मुंबई जवळच्या भाईँदर येथे राहतात. गेल्या 20-22 वर्षांपासून ते गणपतीची मूर्ती साकारत आहेत.

गणपतीची मूर्ती बनवतात म्हणून टीका झाल्याचंही मोहम्मद शेख सांगतात. परंतु राजकारण सोडून आपण कामावर लक्ष दिलं पाहिजे असं ते सांगतात.

गेल्या काही वर्षांपासून मोहम्मद शेख यांनी पीओपीपासून मूर्ती बनवणं सोडून मातीची मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. आपल्या कामातून भाईचारा वाढवणारे मोहम्मद शेख सर्व धर्मियांना महत्त्वाचा संदेश देत आहेत.

  • रिपोर्ट- दीपाली जगताप
  • शूट- शार्दुल कदम
  • व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर