विजयी मेळाव्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानत नेमकं काय म्हटलं?
विजयी मेळाव्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानत नेमकं काय म्हटलं?
हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर सरकारनं हा निर्णय रद्द केला. या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. मात्र, निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्यात आला.
वरळी येथील या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत म्हटलं, "कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षांनी आम्ही एकत्र येतोय. जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं."
यावर फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानत प्रतिक्रिया व्यक्त केली.






