अदानी समूहाच्या खाणीला विरोध, नागपुरातील जनसुनावणीत गोंधळ का झाला?

व्हीडिओ कॅप्शन, अदानी समूहाच्या खाणीला विरोध, नागपुरातील जनसुनावणीत गोंधळ का झाला?
अदानी समूहाच्या खाणीला विरोध, नागपुरातील जनसुनावणीत गोंधळ का झाला?

नागपूर जिल्ह्यातील दहेगाव- गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाकडून जनसुनावणी घेण्यात आली. वलनी गावात ही जनसुनावणी झाली. पण या खाणीला नागरिकांनी विरोध दर्शवला.

ही खाण अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेडची आहे. नद्या तलाव दूषित होण्याच्या भीतीने लोकांनी या खाणीला विरोध दर्शवला. दूषित पाण्याचा शेतीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या 10 ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

नागरिकांनी घोषणाबाजी केली. त्यांचा रोष बघता सुनावणी अगदी काही मिनिटात गुंडाळण्यात आली. विशेष म्हणजे काँग्रेससोबत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा या खाणीला विरोध केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)