'रात्री स्वप्नात मला पुरात वाहून गेलेली जमीन, जनावरं दिसतायत, मला चिंत्या रोग झालाय'

व्हीडिओ कॅप्शन, 'रात्री स्वप्नात मला पुरात वाहून गेलेली जमीन, जनावरं दिसतायत, मला चिंत्या रोग झालाय'
'रात्री स्वप्नात मला पुरात वाहून गेलेली जमीन, जनावरं दिसतायत, मला चिंत्या रोग झालाय'

गेल्या काही वर्षांपासून कमी काळात जास्त पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घायकुतीला आणलं आहे. अशा घटनांमुळं लोकांचं केवळ आर्थिक नुकसान होत नाहीय. तर त्यासोबत अशा घटनांचा त्यांच्या मनावर दीर्घकाळ परिणाम होतोय.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025मध्ये सोलापूर जिल्ह्यातील केवड या गावी सीना नदीला तीनवेळा पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली जमीन वाहून गेलीय. या घटनेचा इथल्या शेतकऱ्यांच्या मनावर मोठा आघात झालाय.

जेव्हा डोळ्यांसमोर घर वाहून जातं, शेत–जंगल नष्ट होतं, तेव्हा आपल्या सभोवतालचं जग बदलून जातं. जिथे आपण लहानाचे मोठे झालो, तोच परिसर अचानक परका वाटू लागतो. या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या वेदना, भीती आणि आपल्याच जागी राहून हरवल्यासारखं वाटणं — या सगळ्याला वैज्ञानिक भाषेत सोलास्टॅल्जिया म्हणतात.

अधिक जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी मराठीचा खास ग्राउंड रिपोर्ट

  • रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)