3 कुटुंबं 150 गायींसह फोफसंडीच्या अंधाऱ्या गुहेत का राहतात?
3 कुटुंबं 150 गायींसह फोफसंडीच्या अंधाऱ्या गुहेत का राहतात?
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील फोफसंडीच्या डोंगरात एक गुहा आहे. या गुहेतच पार्टीशन करून 3 कुटुंबं राहतात. तिन्ही कुटुंबांकडे मिळून जवळपास 150 गायी, 10 म्हशी आणि काही शेळ्या आहेत.
संध्याकाळ झाली की ही जनावरं एकामागोमाग एक गुहेकडे परतायला लागतात. ती आत जातात आणि गुहेतील आपल्या मालकाच्या ठरावीक जागेत दाटीवाटीने उभी राहतात. गुरांसह या गुहेत राहणारी ही कुटुंबं तिसऱ्या–चौथ्या पिढीची असल्याचं इथले रहिवासी सांगतात.
गुहेत राहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं पशुधन आहे.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






