'बॉलिवूडचा बादशाह' अब्जाधीशांच्या यादीत, शाहरूख खान जगातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक

व्हीडिओ कॅप्शन, 'बॉलिवुडचा बादशाह' अब्जाधीशांच्या यादीत
'बॉलिवूडचा बादशाह' अब्जाधीशांच्या यादीत, शाहरूख खान जगातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या वार्षिक रँकिंग, हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार, 59 वर्षीय शाहरुख खानची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

यामुळे तो अर्नोल्ड श्वार्झनेगर, पॉप स्टार रिहाना, गोल्फर टायगर वुड्स आणि गायिका टेलर स्विफ्ट सारख्या जागतिक सेलिब्रिटींच्या यादीत येतो. तिची एकूण संपत्ती फोर्ब्स मासिकाने 1.6 अब्ज डॉलर्स इतकी ठेवली आहे.

यादीत असलेल्या इतर बॉलिवुड व्यक्तिमत्त्वांमध्ये अभिनेत्री जुही चावला, अभिनेता हृतिक रोशन आणि अमिताभ बच्चन आणि चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांचा समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)