शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण फोन नसल्यामुळे 4 दिवसांनी कळली बातमी
शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण फोन नसल्यामुळे 4 दिवसांनी कळली बातमी
पंजाबच्या फरीदकोटमध्ये राहणारे राम सिंग आणि नसीब कौर शेतात मजुरी करणारं हे जोडपं. घराच्या अवस्थेवरून त्यांच्या गरीबीचा अंदाज येतो. पण आता हे दोघेही कोट्यधीश बनले आहेत.
राम सिंग सांगतात की, ते गेल्या 3 वर्षांपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करत आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या बायकोच्या नावाने तिकीट खरेदी केलं. या तिकीटावर त्यांना दीड कोटींची लॉटरी लागली.
6 डिसेंबरला लॉटरी जाहीर झाली, तेव्हा रामसिंग घरी नव्हते. त्यांच्याकडे फोनही नव्हता. त्यामुळे आपल्याला लॉटरी लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही.
4 दिवसांनी परत आल्यावर त्यांना लॉटरी लागल्याचं कळलं तेव्हा त्यांचा आनंदाने काय करू आणि काय नको असं झालं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






